Bollywood actor javed khan amrohi Passed Away :
ADVERTISEMENT
मुंबई : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही (Actor Javed Khan Amrohi) यांचं निधन झालं. वयाच्या ६० व्या वर्षी सांताक्रूझ येथील सूर्या नर्सिंग होममध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाची बातमी ‘चंद्रकांता’चे अखिलेंद्र मिश्रा यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवरून दिली. जावेद खान यांच्या जाण्यानं सिनेजगतात शोककळा पसरली आहे. (Bollywood actor javed khan amrohi died at age of 50 death reason family bio)
जावेद खान यांनी जवळपास १५० चित्रपटांमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यांना २००१ मध्ये आलेल्या ‘लगान’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. लगान’ मधला त्यांचा ‘जीत गए हम’ हा डायलॉग आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. याशिवाय ‘अंदाज अपना अपना’,’फिर हेरा फेरी’ आणि ‘चक दे इंडिया’मधील त्याच्या अभिनयाचेही बरंच कौतुक झालं होतं. जावेद खान यांनी ‘मिर्झा गालिब’ या टीव्ही सीरियलमध्येही काम केले होते. याशिवाय त्यांनी झी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्समध्ये अभिनय शिकविण्याचंही काम केलं.
Bollywood Celebrities Died in 2022: बॉलिवूडने गमावले ‘हे’ सुप्रसिद्ध कलाकार
जावेद खान आमरोही यांचा जन्म मुंबईत झाला होता. पुढे १९७३ मध्ये आलेल्या ‘जलते बदन’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘नूरी’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘बाजार’, ‘रंग बिरंगी’ यांसारख्या चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य दाखवले. जावेद खान अमरोही यांचा शेवटचा मोठा चित्रपट ‘सडक 2’ होता. या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते.
‘आज तक’ सोबत बोलताना अखिलेंद्र मिश्रा म्हणाले, माझा आणि जावेदजींचा दीर्घकाळ सहवास आहे. आम्ही आमची कारकीर्द जवळपास एकाच वेळी सुरू केली. आम्ही त्यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत आणि आम्ही ईप्टाच्या माध्यमातून अनेक शो देखील केले आहेत. माझी – त्याची शेवटची भेट ईप्टा महोत्सवात झाली होती. आम्ही बकरी, राक्षस, सफेद कुंडली या नाटकांमध्ये एकत्र काम केलं. तो खूप दयाळू माणूस होता, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ADVERTISEMENT