ADVERTISEMENT
26 जुलै 2005 ला दुपारनंतर प्रचंड पाऊस पडू लागला, सकाळपासून झालेली सुरूवातही मुसळधारच होती पण दुपारनंतर ढगफुटीसारखा पाऊस कोसळला
पावसाचं पाणी रस्त्यावर साठल्याने जशी मिळेल तशी वाट मुंबईकर या पाण्यातून आणि पावसातून काढत होते
मुंबईला त्यादिवशी अक्षरशः तलावाचं रूप आलं होतं
मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी ट्रेन सेवा अशी ठप्प झाली होती. अनेकांना ट्रेनमध्येच रात्र काढावी लागली अनेकांनी अशा भरलेल्या पाण्यातून वाट काढली
पावसाचं रौद्ररूप या दिवशी मुंबईकरांनी पाहिलं. रस्त्यावर उभ्या असलेल्या शेकडो वाहनांची ही अशी अवस्था झाली होती
या टॅक्सीची अवस्था पाहून तुम्हाला पाऊस किती कोसळला असेल याचा अंदाज येत असेलच
मुंबईतल्या सायन, कुर्ला या स्टेशन्सवर एवढं पाणी भरलं होतं.. या दिवसाच्या आठवणीने अजूनही मुंबईकरांचा थरकाप उडतो
ADVERTISEMENT