कर्जतवरुन कल्याणच्या दिशेने येणाऱ्या भावनगर एक्स्प्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या दरोडेखोरांनी पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला, चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना घाबरवण्याचाही प्रयत्न केला. परंतू प्रवाशांच्या आणि रेल्वे पोलिसांच्या सजगतेसमोर दरोडेखोरांना काही चालले नाही.
ADVERTISEMENT
दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, वसई येथे राहणाऱ्या जया विनोदकुमार या २७ जानेवारीला आपल्या मुलीसह सोलापूरवरुन मुंबईला यायला निघाल्या होत्या. काकीनाडा भावनगर एक्स्प्रेस गाडी जया यांनी पकडली. २८ तारखेला ही गाडी कर्जत स्थानकावरुन बदलापूरपर्यंत पोहचली असता, ५ आरोपींनी जया यांच्या हातातली बॅग हिसकावून घेतली.
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर पेणमध्ये सामुहीक बलात्कार, सात जण अटकेत
यावेळी दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत डब्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. परंतू यावेळी डब्यात उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांनी धैर्याने या दरोडेखोरांचा सामना करत त्यांना घेरलं. यावेळी काही प्रवाशांनी कल्याण रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता रेल्वे पोलिसांनी कल्याण स्थानकात आपलं पथक तयार ठेवलं होतं.
गाडी कल्याण स्थानकात येताच या पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. हे सर्व आरोपी पुण्याच्या कोंढवा भागातले रहिवासी असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. सर्व आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींबद्दल अधिक चौकशी करत असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दुल यांनी दिली.
तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला पोलीस उप-निरीक्षकाने पळवलं, पतीच्या तक्रारीमुळे बारामतीत खळबळ
ADVERTISEMENT