कोरोनाचा कहर वाढत असून अनेक बॉलिवूड कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अशातच अजून एका अभिनेत्रीची भर पडली आहे. अभिनेत्री कंगना रणौतला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावरून कंगनाने याबाबत माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
कंगनाने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कंगना म्हणते, “गेल्या काही दिवसांपासून मला खूप थकवा जाणवत होता. त्याचसोबत माझे डोळे देखील जळजळत होते. त्यामुळे हिमाचलला जाण्यापूर्वी मी काल माझी कोरोना टेस्ट करून घेतली होती. त्या टेस्टचा आज निकाल आला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. य़ानंतर मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, हे मला काहीच माहिती नव्हतं. आता मला माहित आहे की, मी यातून लवकरच पूर्णपणे बरी होईन.”
दरम्यान नुकतंच पश्चिम बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कंगनाने ममता बॅनर्जी यांच्यावर टिका केली होती. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेस विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रणौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.
लवकरच कंगनाचा थलायवी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगना दिवंगत नेत्या जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
ADVERTISEMENT