बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिची परखडं मतं ट्विटरद्वारे मांडत असते. तर मंगळवारी कंगनाचं ट्विट अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. पश्चिम बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कंगनाने ममता बॅनर्जी यांच्यावर टिका केली होती, या कारणामुळे कंगनाचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
ADVERTISEMENT
बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर कंगनाने अनेक ट्विट्स केले होते. तिने तृणमूल कॉंग्रेस पक्षाविरोधात आणि ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाष्य केलं होतं. इतकंच नाही तर कंगनाने एक व्हिडिओही शेअर केला होता. ज्यामध्ये निवडणुकीनंतर भाजपा पक्षाच्या महिलांना मारहाण करण्यात आली असल्याचं तिने म्हटलं होतं.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेस विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रणौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.
कंगनाने यापूर्वीही राजकारणावरून तिची मतं ट्विटवर मांडली होती. बंगाल निवडणूकांपूर्वी कंगनाने महाराष्ट्रातील शिवसेना सरकारवरही ट्विटरद्वारे जोरदार हल्ला केला होता. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जातोय की कंगनाची ही वक्तव्य लक्षात घेता तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT