सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना राणौत फार चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगनाला कोरोनाची लागण झाली होती. तर कालच तिचा कोरोनाच चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला असून आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती कंगनाने दिली आहे. तर आता कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर करत कोरोनावर कशा रितीने मात केली हे सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये कंगना म्हणते, “मी कोणी तज्ज्ञ नाही, परंतु कोरोनाशी लढा दिलेला मी माझा अनुभव शेअर करतेय. आशा आहे की यामुळे मदत होईल. कोरोनावर मात करण्याच्या माझ्या प्रवासापासून लोक शिकू शकतात. म्हणून मी फक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्हिडिओ तयार पोस्ट करतेय.”
कंगना पुढे म्हणते, तुम्ही या प्रॉब्लेमला तीन गटात विभागलं पाहिजे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक. शिवाय काढा प्या, प्राणायाम करा तसंच योग करा. जी योगासन तुम्हाला माहिती आहे ती करा. मीही तेच केलं. मी मानसिक स्वास्थासाठी मंत्रांचा जप केला. मी हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्र खूप ऐकले. यामुळे माझ्या मनात शांतता मिळाली. आणि यानंतर मी 7-8 दिवसांत कोरोनाला हरवलं.
कोरोनाला कसं हरवलं हे सांगणार नाही कारण…; कोरोनावर मात केल्यावर कंगनाची पोस्ट चर्चेत
तर कोरोनावर मात केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये तिने, “मला खूप काही सांगायची इच्छा आहे की मी कोरोनाला कसं हरवलं पण, मला सांगण्यात आलं आहे की कोरोनाच्या चाहत्यांना नाराज करू नको.”असं म्हटलं होतं.
ADVERTISEMENT