ADVERTISEMENT
कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांना एक परफेक्ट कपल म्हटलं जातं.
ज्यावेळी कपिलची लव्हस्टोरी सुरू झाली होती, त्यावेळी कपिलची परिस्थिती बेताचीच होती.
गिन्नी ही श्रीमंत कुटुंबातून होती. त्यांच्यातील या फरकामुळे कपिल आणि गिन्नीला कधी अडचणींचा सामना करावा लागला का? जाणून घेऊयात…
एका मुलाखतीत कपिलने याबाबत सांगितलं होतं. यावेळी त्याने पत्नी गिन्नीचं खूप कौतुक केलं.
कपिल म्हणाला, ‘गिन्नीसोबत जुळवून घेण्यात कधीच अडचण आली नाही. ती चांगल्या कुटुंबातून आहे, पण मेहनत करून मी ही ते सर्व कमावलं.’
“मला गिन्नीबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. जेव्हा मी रस्त्यावर फिरत होतो त्यावेळी गिन्नीने मला साथ दिली.”
कपिल आणि गिन्नी यांना दोन मुलं आहेत. दोघंही आनंदी जीवन जगत आहेत, गिन्नीने कपिलला प्रत्येक कठीण प्रसंगी साथ दिली आहे.
कपिल म्हणाला, ‘तो स्वत:साठी महागड्या वस्तू खरेदी करत नाही. गिन्नी त्याच्यासाठी हे सर्व खरेदी करते.’
कपिल शर्माची आज कोट्यवधींची संपत्ती आहे. पण आजही त्यांची विचारसरणी सामान्य व्यक्तीप्रमाणेच आहे.
ADVERTISEMENT