अभिनेत्री करिना कपूर खान दुसऱ्यांदा आई बनली आहे. करिना आणि सैफ अली खानच्या घरी आज चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. करिनाने आज एका गोंडस लहान मुलाला जन्म दिला आहे. करिना आणि सैफ यांच्या घरी दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे.
ADVERTISEMENT
सैफ आणि करिनाला मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावर पडताच चाहत्यांकडून दोघांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेक सेलिब्रिटी किड्सप्रमाणे करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माचा विषयही सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडमध्ये आलाय. 2020 मध्ये करिना आणि सैफने दुसऱ्यांदा आई-बाबा बनणार असल्याची माहिती दिली होती. तर 2016 नोव्हेंबर मध्ये करिनाने तैमूरला जन्म दिला होता.
ADVERTISEMENT