Kasaba peth assembly bypoll who will become bjp candidate many name in race
ADVERTISEMENT
पुणे : नाशिक पदवीधर निवडणुकीत वेगळंच राजकारण पाहायला मिळालेलं असताना आता कसबा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच निधन झाल्यानंतर कसब्याची जागा रिक्त झाली आहे. एखाद्या आमदाराच्या निधनाने जागा रिकामी झाली असेल तर ती निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. परंतु गेल्या काही निवडणुकांमध्ये या परंपरेला बगल दिल्याने सर्वच पक्ष आता हि पोटनिवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. (kasaba peth assembly bypoll who will become bjp candidate many name in race)
भाजपकडून (BJP) ही निवडणूक बिरविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत, परंतु आम्ही गाफील राहणार नाही असं खुद्द पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अशात भाजपवर निवडणूक लढवण्याची वेळ आली तर भाजपमध्येच कसब्याच्या जागेसाठी अनेक दावेदार आहेत. त्यामुळे नेमकं तिकीट कोणाला द्यायचं याबाबतची भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसब्यात भाजपकडून कोण कोण इच्छुक आहे आणि भाजपची अंतर्गत डोकेदुखी कशी वाढू शकते हे पाहणं गरजेचं आहे.
Kasaba Peth bypoll बिनविरोध? : काँग्रेसचा चेंडू भाजपच्या कोर्टात
‘कसबा पेठ’ मधून भाजपची ही नाव चर्चेत :
दरम्यान, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमधूनही काही नावं पुढं येत आहेत. यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे इच्छुक असल्याची माहिती आहे. याशिवाय कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे यांचीही नाव चर्चेत आहेत.
टिळक घरातचं मिळणार उमेदवारी?
‘पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं’ मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केलं आहे. त्याचबरोबर मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक याला देखील संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वातारवणात सुरु आहे. कुणाल टिळक हा भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे, त्यामुळे तरुण नेतृत्वाला संधी दिली जाऊ शकते.
Kasba Peth Bypoll : रुपाली ठोंबरेंचा पत्ता कट? कसब्यातून ‘ही’ पाच नावं दिल्लीत!
दुसऱ्या बाजूला भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. रासने, घाटे आणि बिडकर या तिघांचं देखील या मतदार संघामध्ये वजन आहे. त्यामुळे उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी हे तिघेही आपआपल्या पातळीवर प्रयत्न करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपने जर शैलेश टिळक किंवा कुणाल टिळक यांना उमेदवारी दिल्यास या दावेदारांची पंचायत होण्याची शक्यता आहे.
तिकडे कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी डावलून चंद्रकांत पाटील हे २०१९ ला कोथरुडमधून निवडूण आल्याने कुलकर्णी नाराज होत्या. त्यामुळे त्यांना कसब्यात संधी देऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते अशी देखील चर्चा आहे. आता या सगळ्या गर्दीमध्ये खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांची देखील कसब्याच्या उमेदवारीसाठी चर्चा आहे.
कसबा हा भाजपचा गड असला तरी विरोधकांकडून या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरु आहेत. मनसेकडून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या रुपाली ठोंबरे यांनी अनेकदा कसब्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. तर काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी देखील ही जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे भाजपसाठी हि निवडणूक सोपी नसणार आहे. परंतु त्या आधी नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय भाजपला घ्यावा लागणार आहे. यातही गटबाजी होण्याचा धोका देखील भाजपला संभवतो.
ADVERTISEMENT