बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लग्न करणार असून, त्यांच्या लग्नाची बॉलिवूडसह सगळीकडेच चर्चा सुरू आहे. दोघांच्या लग्नाबद्दल बरंच काही बोललं जात असून, याबाबत प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे. त्यातच आता लग्नातील नियमांबद्दल बोललं जात असून, त्यावरून सोशल मीडियावर लोटपोट हसायला लावणारे मीम्स व्हायरल झाले आहेत.
ADVERTISEMENT
विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात फोनवर बंदी असणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर लग्नाच्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना सिक्रेट कोड दिले गेल्याचंही बोललं जात आहे. या सगळ्यांवरुन नेटकऱ्यांनी मिम्समधून नियमांची चांगलीच टिंगल उडवली आहे. हे मीम्स बघून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
या मीम्समधून विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला पाहुणे कसे जाणार आहेत, हे व्यंगात्मक दाखवलं आहे.
लग्नाला आलेल्या पाहुण्यांची स्मरणशक्ती पुसून टाकायचंच आता फक्त बाकी राहिल आहे, असं सांगत एकाने लग्नातील नियमांबद्दल म्हटलं आहे.
राजस्थानातील सिक्स सेन्थ सिक्स सेंसेज फॉर्ट हॉटेल या अलिशान हॉटेलमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबद्ध होणार आहेत. त्यासाठी तेथील सुरक्षाही वाढवण्यात आली असून, लग्नाला येणाऱ्यांसाठी कडक नियम तयार करण्यात आल्याचे रिपोर्टस समोर आले आहेत.
ADVERTISEMENT