जयपूर: अखेर लाखो चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे… कापण बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे अखेर पती-पत्नी झाले असून ते आता लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री कतरिना आणि विकी कौशल हे वधू-वराच्या पोषखात अत्यंत सुंदर दिसत आहेत. कतरिना आणि विकी कौशल यांचे चाहते याच क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते.
ADVERTISEMENT
कसा आहे कतरिनाचा ब्रायडल लूक?
कतरिना कैफने गडद गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे. यावेळी कतरिना केसात गजरा, हातात चुडा परिधान केलेली दिसून आली आहे. या ब्रायडल लूकमधील प्रत्येक गोष्ट अत्यंत काही खास आहे. वधू-वर बनलेल्या कतरिना-विकीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी विकी देखील ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये सुंदर दिसत होता. कतरिना आणि विकीची यांची जोडी यावेळी अत्यंत लोभसवाणी दिसत होती. या जोडीची पहिली झलक सोशल मीडियावर पाहायला त्यांचे चाहते देखील खूपच खूश झाले आहेत.
ब्रायडल लूकमध्ये कतरिनाच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत होता.
कतरिनाने तिचा ब्रायडल लुक खूप खास ठेवला आहे. या लूकमध्ये कतरिना एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे. चित्रपटांमध्ये चाहत्यांनी अनेकदा अभिनेत्रीला वधू बनताना पाहिले आहे. पण खऱ्या आयुष्यात नवरी बनल्यानंतर कतरिनाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणि आनंद पाहायला मिळाला.
कसा आहे कतरिनाचा ब्रायडल लूक?
कतरिना कैफने गडद गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे. यावेळी कतरिना केसात गजरा, हातात चुडा परिधान केलेली दिसून आली आहे. या ब्रायडल लूकमधील प्रत्येक गोष्ट अत्यंत काही खास आहे. वधू-वर बनलेल्या कतरिना-विकीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी विकी देखील ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये सुंदर दिसत होता. कतरिना आणि विकीची यांची जोडी यावेळी अत्यंत लोभसवाणी दिसत होती. या जोडीची पहिली झलक सोशल मीडियावर पाहायला त्यांचे चाहते देखील खूपच खूश झाले आहेत.
ब्रायडल लूकमध्ये कतरिनाच्या चेहऱ्यावर विशेष आनंद
कतरिनाने तिचा ब्रायडल लुक खूप खास ठेवला आहे. या लूकमध्ये कतरिना एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे. चित्रपटांमध्ये चाहत्यांनी अनेकदा अभिनेत्रीला वधू बनताना पाहिले आहे. पण खऱ्या आयुष्यात नवरी बनल्यानंतर कतरिनाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणि आनंद पाहायला मिळाला.
कतरिना-विकीचा राजेशाही लग्नसोहळा
बॉलीवूडमधील सर्वात मोहक जोडपे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेंसेस फोर्ट बरबाडा येथे अत्यंत शाही पद्धतीने लग्न केले. सात फेरे घेऊन या जोडप्याने एकमेकांचा हात कायमचा हातात घेतला आहे.
कतरिनाच्या रॉयल वेडिंगने चाहत्यांच्या मनात घर केले आहे आणि जेव्हा-जेव्हा बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या आणि भव्य विवाहसोहळ्यांबाबत चर्चा होईल तेव्हा सर्वात आधी कतरिना-विकीच्या लग्नाची देखील आठवण नक्कीच काढली जाईल.
vickatwedding: करण जोहर ते फराह खान; विकी कौशल-कतरिना कैफच्या लग्नात हे सेलिब्रिटी असणार पाहुणे
कतरिना-विकीच्या लग्नाला या बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावली हजेरी
कतरिना आणि विकीने त्यांच्या ग्रॅंड वेडिंगसाठी अगदी मोजक्याच लोकांना बोलावलं आहे. दरम्यान, यावेळी लग्नाला काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली आहे. या लग्नाला फक्त 120 लोक उपस्थित असल्याचं वृत्त आहे. मात्र, कतरिनाने तिचे जवळचे मित्र सलमान आणि अक्षय यांना लग्नासाठी आमंत्रित केलेलं नसल्याचं समजतं आहे. कतरिनाच्या लग्नात सलमान नसल्याने चाहते थोडे निराश झाले आहेत. पण कतरिनाचे लग्न झाल्याचे पाहून चाहते खूप खुश आहेत.
या जोडप्याचे चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीचं खूप अभिनंदन करत आहेत आणि जोडप्याचे सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि त्यांनी कायम एकत्र राहावे यासाठी प्रार्थना करत आहेत.
ADVERTISEMENT