नेत्यांच्या मागे गर्दी असते, त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही?; केदार शिंदे यांचा सवाल

मुंबई तक

• 08:19 AM • 27 Apr 2021

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. राज्यात देखील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. त्याचसोबत विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान नेत्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या गर्दीवरून मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. इन्स्टाग्रामच्या स्टोरीमार्फत केदार यांनी एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये ते म्हणतात, “टीव्हीला […]

Mumbaitak
follow google news

सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. राज्यात देखील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. त्याचसोबत विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान नेत्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या गर्दीवरून मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे वाचलं का?

इन्स्टाग्रामच्या स्टोरीमार्फत केदार यांनी एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये ते म्हणतात, “टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते,त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!”

सध्या देशात ऑक्सिजनचीही कमतरता जाणवतेय. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे काहींना जीव देखील गमवावा लागलाय. यापूर्वी केदार यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते, “भविष्यात वीज-गॅसप्रमाणे ऑक्सिजनच्या वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको, स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वाससुद्धा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करुन दिला नाही. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष….”

    follow whatsapp