Today Horoscope : सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल? 'या' राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज!

मुंबई तक

• 11:36 AM • 01 Sep 2024

1st September Horoscope Update: ग्रहांची स्थिती : गुरु वृषभ राशीमध्ये, मंगल मिथुन राशीत, कर्क राशीत बुध आणि चंद्रमा, केतू आणि शुक्र कन्या राशीत, सूर्य सिंह राशीमध्ये, शनी वक्री होऊन कुंभ राशीत आणि राहू मीन राशीच्या गोचरमध्ये चाल करत आहे. 

1 st September Horoscope

1 st September Horoscope

follow google news

बातम्या हायलाइट

point

सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असले? राशी भविष्य जाणून घ्या

point

या राशींच्या लोकांना मिळू शकतो मोठा लाभ

point

सर्व राशींची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

1st September Horoscope Update: ग्रहांची स्थिती : गुरु वृषभ राशीमध्ये, मंगल मिथुन राशीत, कर्क राशीत बुध आणि चंद्रमा, केतू आणि शुक्र कन्या राशीत, सूर्य सिंह राशीमध्ये, शनी वक्री होऊन कुंभ राशीत आणि राहू मीन राशीच्या गोचरमध्ये चाल करत आहे. 

हे वाचलं का?

मेष राशी : घरगुती कार्यक्रमात व्यग्र असाल. घराशी संबंधीत काही खरेदी करू शकता. महागड्या वस्तूंमध्ये वाढ होऊ शकते. आरोग्यात सुधारणा होईल. प्रेमाची स्थिती चांगली राहील. मुलांचं आरोग्य उत्तम राहिल. उद्योगधंदाही व्यवस्थीत राहिल. हिरव्या वस्तुंचं दान करा.

वृषभ राशी : आरोग्याची काळजी घ्या. प्रेम संबंधांची स्थीती चांगली आहे. मुलांचं आरोग्य चांगलं राहिल. व्यापारात काही नवीन गोष्टी घडतील, ज्यामुळे सुख-समृद्धी वाढेल. आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. हिरवी वस्तू जवळ ठेवा.

मिथुन राशी : आर्थिक मिळण्याची वेळ आहे. कुटुंबात समृद्धी होईल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहिल. उद्योगधंद्यात चालना मिळू शकते.

कर्क राशी : आरोग्याची स्थिती चांगली राहिल. तुम्हाला शक्तीशाली असल्यासारखं वाटेल. ज्ञानी असल्यासारखं वाटेल. प्रेम, मुलं आणि व्यापार, आरोग्याची स्थिती मध्यम स्वरुपात आहे. हिरव्या वस्तूचं दान करा.

हे ही वाचा >>  Ladki Bahin Yojana : महिलांनो, खाते तपासायला सुरू करा...आजच 3000 जमा होणार?

सिंह राशी : खर्च अधिक होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहणार नाही. अनावश्यक काळजी वाटेल. प्रेम, मुलं, व्यापाराची स्थिती उत्तम राहिल. पिवळी वस्तू जवळ ठेवा.

कन्या राशी : आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ शकते. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रवास योग घडू शकतो. आरोग्याची काळजी घ्या. प्रेम, मुलं, व्यापाराची स्थिती खूप चांगली आहे. 

वृश्चिक राशी : नशिब साथ देईल. रोजगारात समृद्धी मिळेल. प्रवास योग घडू शकतो. काही चांगली कामं होतील. धर्म-कर्म मध्ये सहभागी व्हाल. आरोग्य चांगलं राहिल. प्रेम, मुलं, व्यापाराची स्थिती चांगली आहे. पिवळी वस्तू जवठ ठेवा.

हे ही वाचा >> Sanjay Raut : ''...तर तुमचा कडेलोट केला असता'', संजय राऊतांनी महायुतीवर डागली तोफ

धनू राशी : दुखापत होण्याची शक्यता आहे. एखाद्या अडचणीत सापडू शकता. परिस्थिती अनुकूल आहे. आरोग्य मध्यम स्वरुपात आहे. प्रेम, मुलं आणि व्यापाराची स्थिती चांगली आहे. लाल वस्तू जवळ ठेवा.

मकर राशी : पार्टनरचं खूप सहकार्य लाभेल. नोकरी-व्यापाराची स्थिती चांगली राहिल. आरोग्य, प्रेम, मुलं, व्यापाराची स्थिती चांगली असेल.

कुंभ राशी : शत्रुंचा पराभव करू शकता. बौद्धिक क्षमनेतं तुम्ही सर्वांवर नियंत्रण मिळवू शकता. प्रेम, मुलं, आरोग्या, व्यापार चांगलं राहिल. हिरवी वस्तू जवळ ठेवा.

मीन राशी : ज्ञानी होऊ शकता. बुद्धीमान व्हाल. अभ्यासात वेळ घावला. मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. प्रेम, मुंल, आरोग्याची स्थिती चांगली आहे.

टीप - राशी भविष्याबाबत दिलेल्या माहितीची मुंबई तक कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही.

    follow whatsapp