गेल्या दोन वर्षांपासून डोंबिवलीकरांना वाट पहायला लावणारा कोपर पूल अखेरीस नागरिकांच्या भेटीला येणार आहे. ७ सप्टेंबरला दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचं ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी अशी माहिती दिली.
ADVERTISEMENT
कोपर उड्डाण पुल धोकादायक झाल्यामुळे 15 सप्टेंबर 2019 पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. सदर पुल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कोव्हीड -19 च्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद असताना उड्डाण पुल पुर्नबांधणीचे काम महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने तातडीने हाती घेण्यात आले. अत्यंत कमी वेळात कोपर पुलाचे सर्व गर्डर बसविण्यात आले. त्यानंतर पुलाच्या संरक्षक भिंतीचे व स्लॅब भरण्याचे काम रखडले. अखेर चार दिवस झाले पावसाने थोडी उसंत आणि महापालिका व रेल्वे अधिकारी यांनी स्लॅब भरणे, क्यूरिंग, डांबरीकरण आणि रंगरंगोटी असा सुमारे 12 .4 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण काम पूर्ण केले.
गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या डोंबिवलीकरांना गणेश चतुर्थीपासून नव्या कोपर पुलावरून ये-जा करता येणार आहे. यापूर्वी जोशी हायस्कूल उड्डाणपूलमुळे डोंबिवली पश्चिम लोकांना कोविड काळात त्याचा खूप उपयोग झाला. त्याच्यावर मोठा ताण आला होता, वाहतूक कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले होते. आता कोपर पुल खुला केल्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
डोंबिवलीकरांसाठी महत्वाच्या असलेल्या कोपर पुलाचे काम सूरु झाल्यापासून 1 वर्षे 4 महिने कालावधीत आपण हा पूल सुरू केला आहे. 253 मीटर लांबी पुलाची असून रुंदी ही वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उभा पुलाचे उदघाटन होऊन पूल वाहतुकीसाठी खुला होईल.
डॉ. विजय सूर्यवंशी ( केडीएमसी आयुक्त )
ADVERTISEMENT