शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी गाझीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यासह आंदोलक शेतक-यांची भेट घेतली. त्याच पार्श्वभूमीवर कॉमेडियन कुणाल कामराने मिश्किल ट्विट करत त्यावर भाष्य केलं आहे. कुणालने आपल्या ट्विटमध्ये ट्रॅक्टर आणि बुलडोझरचा फोटो ट्विट करत त्याला मिले सूर मेरा तुम्हारा असं कॅप्शन दिलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबईला पाक व्याप्त काश्मीरची उपमा देणा-या कंगनाच्या बांद्र्यातील अनधिकृत कार्यालयावर कारवाई करत शिवसेनेची सत्ता असणा-या मुंबई महापालिकेने बुलडोझर चालवला होता. त्यानंतर संजय राऊत यांची शटअप या कुणाल या शोमध्ये मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी कुणालने संजय राऊतांना बुलडोझर भेट म्हणून दिला होता. त्यानंतर आता त्याने ट्रॅक्टर रॅली काढणा-या आंदोलक शेतक-यांचे नेते राकेश टिकेत यांना ट्रॅक्टरची उपमा दिली आहे.
संजय राऊत यांनी मंगळवारी गाझीपूर सीमेवर जाऊन राकेश टिकैत आणि इतर आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. या ठिकाणी जो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे तो पाहून संजय राऊत यांनी देशात लोकशाही जिवंत आहे का असा सवाल केला. आंदोलनादरम्यान शेतक-यांचे झालेले मृत्यू हे मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. शिवसेनेने आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ गाझीपूर सीमेवर गेलं होतं. संजय राऊत आणि राकेश टिकेत यांची भेट होताच राऊत यांनी टिकेत यांची गळाभेट घेतली. यावेळी टिकेत यांनी अश्रू अनावर झाले. यावेळी संजय राऊत यांनी शेतक-यांशी चर्चा केली.
महाराष्ट्र आणि देशातील आणखी अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे व्हिडिओ देखील पहा..
ADVERTISEMENT