कोव्हिड सेंटरमध्ये लॅब टेक्निशियनचा मृतदेह सापडला लटकलेल्या अवस्थेत, हत्या की आत्महत्या?

मुंबई तक

• 10:42 AM • 17 Feb 2022

बिहार: बिहारमधील सीतामढीमधील डुमरा पोलीस स्टेशन हद्दीतील शांतीनगर येथे असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण कोव्हिड सेंटरमध्ये घबराट पसरली आहे. वास्तविक, कोव्हिड सेंटरच्या (covid center) छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या पाईपला एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रथम दर्शनी हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद […]

Mumbaitak
follow google news

बिहार: बिहारमधील सीतामढीमधील डुमरा पोलीस स्टेशन हद्दीतील शांतीनगर येथे असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण कोव्हिड सेंटरमध्ये घबराट पसरली आहे.

हे वाचलं का?

वास्तविक, कोव्हिड सेंटरच्या (covid center) छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या पाईपला एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रथम दर्शनी हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तात्काळ तपास सुरू केला आहे. दुसरीकडे आरोग्य कर्मचारी संघटनेच्या एका नेत्याने ही हत्या असल्याचा आरोप केला आहे.

…तर आत्महत्या कशी?

ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबत लागलीच काही बोलणं हे घाईचं होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्याचवेळी घटनास्थळी पोहोचलेले जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे नेते रमाशंकर सिंह यांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

कोव्हिड सेंटरमध्ये पाईप हे खूपच कमी उंचीवर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे इथे फाशी घेऊन आत्महत्या करणं शक्यच नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण तपासाचा विषय आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यानेही याला संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. मात्र तपासाबाबत अद्याप कोणतीही नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. प्रवीण गिरी असे मृताचे नाव असून तो बिहारच्या छपरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. सीतामढी सदर रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती.

Covid सेंटर परिसरातच कर्मचाऱ्यांची दारु, गांजा पार्टी; धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

पोलिसांनी प्रविणचा मृतदेह ताब्यात घेऊन तात्काळ पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता या पोस्टमॉर्टम अहवालानंतरच प्रविणच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. मात्र एकूणच या सगळ्या प्रकारामुळे कोव्हिड सेंटरमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसंच सेंटरमधील सुरक्षेबाबत देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

    follow whatsapp