पुण्यात Corona रूग्णांवर उपचारांसाठी बेड्सचा तुटवड़ा, व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता

मुंबई तक

• 02:07 PM • 06 Apr 2021

पुणे शहरात मागील पंधरा दिवसांपासून दररोज सरासरी 4 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळत आहे. तर 25 हून अधिक रुग्ण दररोज मृत्यूमुखी पडत आहे. एका बाजूला वाढती रुग्ण संख्या आणि दुसर्‍या बाजूला वाढता मृत्यू दर, यामुळे प्रशासनासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्याच दरम्यान शहरातील कोणत्याही रूग्णालयात नव्याने दाखल होणार्‍या रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाकडून सांगितले […]

Mumbaitak
follow google news

पुणे शहरात मागील पंधरा दिवसांपासून दररोज सरासरी 4 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळत आहे. तर 25 हून अधिक रुग्ण दररोज मृत्यूमुखी पडत आहे. एका बाजूला वाढती रुग्ण संख्या आणि दुसर्‍या बाजूला वाढता मृत्यू दर, यामुळे प्रशासनासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्याच दरम्यान शहरातील कोणत्याही रूग्णालयात नव्याने दाखल होणार्‍या रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाकडून सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक रुग्णालय बाहेर रुग्णांचे नातेवाईक केव्हा उपचारासाठी केव्हा बेड मिळेल याकडे डोळे लावून बसले आहेत.

हे वाचलं का?

जगभरात कोरोना आजाराने वर्षभरापासून थैमान घातले आहे. अशीच परिस्थिती आजही कायम आहे. मात्र मागील पंधरा दिवसात आपल्या देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ‘मिनी लॉकडाऊन’ च्या दिशेने वाटचाली सुरू केली असून पण कडक निर्बंध लागू केले आहेत. पण तरी देखील रुग्ण संख्या आटोक्यात येण्यात अद्याप ही यश आले नाही.

सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत पुणे शहरात दिवसभरात 4 हजार 77 करोना बाधित रुग्ण आढळले असून आज अखेर 2 लाख 94 हजार 121 इतकी संख्या झाली आहे. तर त्याच दरम्यान 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 5 हजार 488 मृतांची संख्या एकट्या पुण्याची झाली झाली आहे. काल दिवसभरात 3 हजार 240 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजअखेर 2 लाख 45 हजार 892 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. तर सध्या 42 हजार 741 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी 90 टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

मात्र आज आणखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून ज्या नागरिकांचे रिपोर्ट बाधित असल्याचे आले आहे. त्यांनी महापालिकेच्या हेल्पलाईन वर फोन केल्यास नाव नोंद करून घेतात आणि बेड उपलब्ध होताच कळवू असे सांगितले जात आहे. तर दुसर्‍या बाजूला खासगी रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांची रांग लागली आहे. आपल्याला केव्हा उपचार मिळतात, या प्रतिक्षेत हे रुग्ण आहेत.

औंध जिल्हा रुग्णालय च्या डेप्युटी सर्जन श्रीमती डोईफोडे यांनी मुंबई तक ला सांगितले की, आमच्या रूग्णालयात 85 बेड पैकी 15 व्हेंटीलेटरचे असून त्यातील 10 व्हेंटीलेटरचे बेड उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना लस घेताना आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्याल? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

रुबी रुग्णालयाचे संचालक काय म्हणतात?

परवेझ ग्रँट म्हणाले की, कोरोना आजारावर उपचार घेणार्‍या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही तीन हॉटेल भाड्याने घेतले. तिथे ऑक्सिजन साधे आणि स्पेशल बेड याची व्यवस्था केली आहे. या तीन ही हॉटेलमध्ये 180 आणि रुग्णालयाचे 200 असे मिळून 380 बेडची संख्या झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर रूबी क्लिनिक मधे 90 व्हेंटीलेटर बेड्स ची सोय आहे, सर्वच व्हेंटिलेटर बेड्स अति गंभीर कोरोना रुग्णाचा उपचारासाठी वापर होत आहे ।

पुणे महानगरपालिकेच्या नायडू रुग्णालयातील डॉ. श्री. पाटसुते म्हणाले की, आपल्या शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आपण रूग्णांना सेवा देण्याचे काम केले आहे. मात्र मागील पंधरा दिवसात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या रूग्णालयात

120 बेड असून त्याही पेक्षा आपण 155 रुग्णावर उपचार सुरू देत आहोत. या 120 बेडमध्ये 25 आयसीयू आणि बेड 11 व्हेंटीलेटर असल्याचे त्यांनी सांगितले.

एकूणच पुण्याची परिस्थिति 2020 च्या तुलनेत गंभीर आहे । पण पुणे महापालिके तर्फे अधिक वेंटीलेटर बेड्स ची सोय केली जात आहे असा विश्वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मुंबई तकला सांगितले.

    follow whatsapp