Lakhimpur Kheri case: लखीमपूरमध्ये ‘कट’ रचून शेतकऱ्यांची हत्या: केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलाविरुद्ध कलम 307!

मुंबई तक

• 02:11 PM • 14 Dec 2021

उत्तर प्रदेश: लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आणि मुख्य आरोपी आशिष मिश्रा याच्यासह सर्व 13 आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण तपास अधिकाऱ्यांच्या अर्जावर न्यायालयाने सर्व आरोपींवरील खून, निर्दोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणे वाहन चालविण्याचे कलम काढून एका मताने खुनाचा प्रयत्न आणि परवानाधारक बंदुकीचा गैरवापर हे कलम लावण्यास मंजुरी दिली आहे. कोर्टाने दिलेल्या या मंजुरीमुळे […]

Mumbaitak
follow google news

उत्तर प्रदेश: लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आणि मुख्य आरोपी आशिष मिश्रा याच्यासह सर्व 13 आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण तपास अधिकाऱ्यांच्या अर्जावर न्यायालयाने सर्व आरोपींवरील खून, निर्दोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणे वाहन चालविण्याचे कलम काढून एका मताने खुनाचा प्रयत्न आणि परवानाधारक बंदुकीचा गैरवापर हे कलम लावण्यास मंजुरी दिली आहे.

हे वाचलं का?

कोर्टाने दिलेल्या या मंजुरीमुळे तुरुंगात असलेल्या आशिष मिश्रासह सर्व आरोपींवर खून आणि खुनाचा प्रयत्न या कलमांखाली वॉरंट काढण्यात आले आहे. मंगळवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून नवीन कलमांखाली वॉरंट बजावल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीच्या इन्स्पेक्टर विद्या राम दिवाकर यांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल कलम 279, गंभीर दुखापत केल्याबद्दल कलम 338 लावण्यात आले आहे.

यावेळी जे 304 A कलम लावण्यात आले होते ते हटवून आता आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 307 लावण्यात आले आहे. याशिवाय धोकादायक शस्त्रे वापरुन दुखापत केल्याप्रकरणी कलम 326, कट रचून घटना घडवून आणण्यासाठी कलम 34 आणि परवानाधारक शस्त्रांचा गैरवापर केल्याबद्दल कलम 3/25/30 आर्म्स अॅक्ट यांचा समावेश करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता.

सुनावणीनंतर सीजेएमने ही नवीन कलमे स्वीकारत सर्व आरोपींसाठी वॉरंट काढले आहे. आता आशिष मिश्रासह सर्व आरोपींवर आयपीसी कलम 147, 148, 149, 307, 326, 302, 34, 120 ब आणि 3/25/30 शस्त्रास्त्र कायदा या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्या अंतर्गत हे सर्व आता तुरुंगात असतील. तसेच आता नवीन कलमांनुसार या संपूर्ण प्रकरणाची कार्यवाही केली जाईल.

दरम्यान, या सुनावणीनंतर आशिष मिश्रा यांचे वकील अवधेश सिंह यांनी दावा केला की, पोलिसांनी हत्या झाल्याचे सांगितल्यानंतर आता त्यांचे काम सोपे झाले आहे. अवधेश सिंग यांचे म्हणणे आहे की, आशिष मिश्राविरुद्ध खुनाचा कोणताही पुरावा नाही.

कोणालाही गोळी लागली नाही, सर्व लोक चिरडून मारले गेले. त्यामुळे या हत्याकांडप्रकरणी पोलिसांना आरोपपत्र दाखल करता आले नाही. कारण हत्या करणाऱ्या थार जीपच्या चालक देखील मारला गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

लखीमपूर प्रकरण : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या अडचणी वाढल्या; ‘फॉरेन्सिक’चा रिपोर्ट आला समोर

आरोपींना कोर्टात हजर करण्यापूर्वी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा देखील त्यांचा मुलगा आणि मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला भेटण्यासाठी लखीमपूर जेलमध्ये गेले होते.

एसआयटीच्या तपास अधिकाऱ्याने ज्या प्रकारे हत्येचा प्रयत्न आणि कट रचून घटना घडवून आणणे. यासारख्या कलमांचा विस्तार न्यायालयात अर्ज देऊन केला आहे, त्यावरून लखीमपूर हिंसाचार प्रकरणात पोलीस लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहेत. असे निश्चितपणे म्हणता येईल.

    follow whatsapp