कोरोना महामारीच्या काळात लॉकडाउमध्ये घरमालकांनी भाडेकरुंकडून घरभाडं वसुली करताना कोणत्याही प्रकारचा अतिरेक करु नये असं आवाहन काही महिन्यांपूर्वी सरकारतर्फे करण्यात आलं होतं. परंतू नागपुरात एका भाडेकरुने याचा अवाजवी फायदा उचलल्याचं दिसतंय. भाडेकरुच्या जाचाला कंटाळून नागपुरात घरमालकानेच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
नागपुरात घर भाड्याने घेणाऱ्या एका भाडेकरूने दर महिन्याला घराचे भाडे देणे तर सोडाच…उलट घरमालकाकडून घर रिकामे करण्यासाठी पैसे वसूल केले. इतकच नव्हे तर या भाडेकरुने नंतर घर मालकाकडून लाखोंची खंडणीही मागितली. घरमालकाने ती देण्यास नकार दिल्यानंतर वारंवार शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
भाडेकरूंच्या या जाचाला कंटाळून अखेर मुकेश रिझवानी या घर मालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी मुकेश यांनी भाडेकरूंनी दिलेल्या सर्व त्रास एका व्हिडिओमध्ये सांगत तो व्हिडिओ अनेकांना पाठवला आणि त्यानंतर आत्महत्या केली.
PUBG गेमच्या नादात 19 वर्षीय तरुणीची आत्महत्या?, राहत्या घरात घेतला गळफास
मुकेश रिझवानी यांनी आरोपी राजेश सेतीया ला मे 2019 पासून घराच्या काही खोल्या भाड्याने दिल्या होत्या. परंतु, सेतीया त्यांना नियमित घरभाडे देत नव्हता. एकदा घरभाडे मागण्यासाठी मुकेश रिझवानी हे राजेश सेतीयाकडे गेले असता आरोपी राजेश सेतीया आणि त्याचा भाऊ मूलचंद सेतीया यांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि साडेचार लाखांची खंडणी मागितली.
वाढती गुन्हेगारी ठरतेय चिंतेचा विषय, NCRB च्या रेकॉर्डनुसार नागपूर गुन्हेगारीत अव्वल
घर रिकामे झाल्यास कायमची कटकट सुटेल म्हणून मुकेश रिझवानी यांनी सेतीयाला काही पैसेही दिले. मात्र, त्यानंतर आरोपी राजेश सेतीयाने त्यांना आणखी पैसे मागितले. आरोपींनी मुकेश रिझवानी यांना वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. याच त्रासापोटी रिझवानी यांनी गळफास घेऊन 6 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मुकेश यांनी त्यांच्या भाडेकरूवर गंभीर आरोप लावत तो व्हिडिओ व्हायरल केला होता.
ADVERTISEMENT