कर्जाची परतफेड केल्यानंतरही गहाण ठेवलेली २० गुंठे जमीन परत करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या सावकारावर पंढरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाखरी, तालुका पंढरपुर येथे संजय लेंगरे हे राहत असुन त्यांची या भागात वडिलोपार्जीत शेती आहे. सन 2016 मध्ये संजय लेंगरे यांनी सतीश तानाजी घंटे यांच्याकडून 5 लाख 45 हजार रुपये रक्कम घेतली होती. त्याबदल्यात त्यांनी सतीश तानाजी घंटे यांना एक एकर वडीलोपार्जीत जमिनिपैकी 20 गुंठे जमीन लिहुन दिली होती. त्यावेळी सदर रक्कम परत केल्यानंतर जमिन परत देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे संजय लेंगरे यांनी 23 जुलै 2018 रोजी सतीश तानाजी घंटे यांना 2 लाख रुपये परत केले होते. यानंतर उर्वरीत रक्कम देखील परत करुनही जमिन संजय लेंगरे यांच्या नावावर केली नाही.
सतीश तानाजी घंटे यांनी संजय लेंगरे यांना तुमची मुद्दल व व्याज मिळुन वीस लाख रुपये होतात असे सांगीतले. संजय लेंगरे यांनी 7 लाख रुपये घे परंतू आमची जमीन आम्हाला परत दे असे सांगीतले. परंतू त्याने त्यास नकार दिला व 20 लाख रुपयांची मागणी करु लागला. यानंतर संजय लेंगरे यांनी पोलिसांत तक्रार करण्याचं ठरवल्यानंतर सतिश घंटे यांनी त्यांना असं करु नका, मी तुम्हाला तुमची जमीन परत देतो असं कबूल केलं. याबद्दल दोघांमद्ये कागदोपत्री करारही झाला. परंतू काही दिवसांनी सतीश घंटे या सावकाराने पुन्हा एकदा आपला शब्द फिरवत २० लाखांची मागणी केली.
लातूर : कीर्ती ऑईल मिलमध्ये पुन्हा दुर्घटना; बॉयलरवरून पडून कामगाराचा मृत्यू
यामुळे संजय लेंगरे यांनी सतीश घंटेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पंढरपूर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यातील आरोपी सतिश तानाजी घंटे यास अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Crime: धक्कादायक… 12 वर्षीय मुलाचा 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
ADVERTISEMENT