Laxman Hake on BJP : "आम्ही BJPला निवडून देण्याचं आवाहन केलं, पण आता गिल्टी फील होतंय"

Laxman Hake Interview : लक्ष्मण हाके म्हणाले, मी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. माझी भूमिका सुरेश धस, मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात आहे.

Mumbai Tak

सुधीर काकडे

12 Jan 2025 (अपडेटेड: 12 Jan 2025, 11:16 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

"भाजपकडून आम्हाला कॉर्नर केलं जातंय"

point

"धनंजय मुंडे यांच्यावर मिडिया ट्रायल होतेय"

point

"भाजपला निवडून देण्याचं आवाहन केलं, पण गिल्टी फील होतंय"

लक्ष्मण हाके यांनी वंजारी समाजाला टार्गेट केलं जात असल्याचं म्हणत सुरेश धस, मनोज जरांगे, संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरोपींना फाशी द्या, पण एखाद्या कम्युनिटीला टार्गेट करु नका असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. हे राजकीय नेते असून, यांना फक्त निवडणुकीचं व्याकरण कळतं. बीडमध्ये कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधक हेच कळत नाही. माझ्यासारख्या माणसाची बुद्धी हँग होण्याची वेळ आली असं लक्ष्मण हाके म्हणाले. 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मण हाके यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका मांडली. 

हे वाचलं का?

लक्ष्मण हाके यांनी यावर बोलताना पुढे असंही सांगितं की, सुरेश धस यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत, प्रभू रामचंद्रांच्या सातबाऱ्याला चुना लावणारा सुरेश धस भाजपच्या कुठल्या अजेंड्यामध्ये बसतो. आम्ही ओबीसी बांधवांनी भाजपला निवडून द्या म्हणून आवाहन केलं होतं, पण आम्हाला आता गिल्टी फील होतंय असं हाके म्हणाले. तसंच भाजपकडूनच आम्हाला कॉर्नर केलं जातंय असंही लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. 

हे ही वाचा >> Ravindra Chavan: ठरलं... फडणवीसांचे निकटवर्तीय भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, रवींद्र चव्हाणांवर मोठी जबाबदारी

मी एक ओबीसी आंदोलक आहे, मी ओबीसी हिताचं समाजकारण, राजकारण करत असेल, तर धनंजय मुंडे यांच्यावर अन्याय होऊ नये अशी माझी भूमिका आहे. मी वर्षानुवर्ष भुजबळ, पडळकर, जानकर यांचं समर्थन करतोय. कुणावरही मिडिया ट्रायल होऊ नये, आमच्या नेत्याचा बळी जाऊ नये. मीडियावर त्यांच्या पर्सनल गोष्टी शोधल्या जात आहेत असंही लक्ष्मण हाके म्हणाले. 

हे ही वाचा >> Chandrashekhar Bawankule: "उद्धव ठाकरेंनी 2019 ला ब्लंडर मिस्टेक केली...", चंद्रशेखर बावनकुळेंनी राऊतांना दिलं रोखठोक उत्तर

लक्ष्मण हाके म्हणाले, मी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. माझं फक्त म्हणणं आहे की, एखाद्या व्यक्तिच्या आडनावावरुन त्याच्या जातीया आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. त्यामुळे माझं आंदोलन सुरेश धस, मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात आहे असं हाके म्हणाले. 

    follow whatsapp