सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एका गरीब कुटुंबातील मुलीची एका महिलेने ६ जणांना विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर शारिरिक अत्याचार झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत विक्री करणाऱ्या महिलेसह सहा गिऱ्हाईकांना अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही गरीब कुटुंबातली आहे. या मुलीच्या गरीबीचा फायदा घेत आरोपी महिलेने तिला बाहेर फिरायला घेऊन जाते, खाऊ देते असं आमिष दाखवून हे कृत्य केल्याचं कळतंय. आरोपी महिला या मुलीला बाहेर घेऊन गेल्यानंतर पाटण परिसरात विविध लोकांशी ओळख करुन देऊन त्यांच्याशी शारिरिक संबंध ठेवायला भाग पाडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
महाराष्ट्र हादरला ! ५५ वर्षीय नराधमाचा तीन अल्पवयीन मुलींवर शारिरिक अत्याचार
पाटण शहरात सहा गिऱ्हाईकांनी विविध ठिकाणी या मुलीवर अत्याचार केल्याचं कळतंय. पीडित मुलीच्या आईला याबद्दल माहिती कळताच तिने पोलिसांत जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी महिलेसह सहा गिऱ्हाईकांची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. आरोपी महिलेने पीडित मुलीला आणखी कोणत्या गिऱ्हाईकांकडे विकलं होतं का याचा तपासही पोलीस अधिकारी करत आहेत. विशेष बाब म्हणजे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडल्यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं, आईने आपल्याच मुलाची केली हत्या
ADVERTISEMENT