ADVERTISEMENT
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील बोरपटी परिसरात सावजाच्या शोधात असलेला बिबट्या विहीरीत पडला.
या परिसरात राहणारे शेतकरी बालाजी घोलप हे सकाळी आपल्या शेतात जात असताना या विहीरीच्या जवळ पोहचले असता त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज यायला लागला.
कुत्र्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहीरीत पडल्याचा अंदाज आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घोलप यांनी वनविभागाला याबद्दलची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा विहीरीत सोडला.
बिबट्याला काही होऊ नये यासाठी माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राच्या डॉक्टरांची टीमही इथे हजर होती. बिबट्या विहीरीत पडल्याचं कळताच स्थानिकांनीही इथे गर्दी केली.
पिंजरा जवळ येताच बिबट्याने त्यात उडी मारली आणि रेस्क्यू टीमने पिंजरा वर ओढायला सुरुवात केली.
बिबट्याला बाहेर काढल्यानंतर वनविभागाने हा पिंजरा आपल्या गाडीत आणून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं.
ADVERTISEMENT