Videocon owner Venugopal Dhoot arrested: मुंबई: बँक कर्ज फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने (CBI) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सीबीआयने व्हिडिओकॉनचे (Videocon) मालक वेणुगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांना अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने ICICI बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर (Chanda Kochar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochar) यांना अटक केली होती. (loan fraud case after chanda kochhar videocon owner venugopal dhoot arrested)
ADVERTISEMENT
चंदा कोचर ICICI बँकेच्या प्रमुख असताना त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला बेकायदेशीरपणे कर्ज दिले असा आरोप आहे. या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू रिन्यूएबल कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली होती. व्हिडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचे बँक कर्ज दिल्याप्रकरणी सीबीआयने गेल्या आठवड्यात ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे दीपक कोचर यांना अटक केली होती. यानंतर मुंबईतील विशेष न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
2012 मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपला ICICI बँकेने कर्ज दिले होते. या प्रचंड मोठ्या कर्जाची 85 टक्के रक्कम व्हिडिओकॉनने फेडलीच नाही. त्यामुळे हे कर्ज नंतर एनपीए करण्यात आलं. त्यालाच ‘बँक फ्रॉड’ असे म्हटले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दीपक कोचरला अटक केली होती. खरं तर, 2012 मध्ये चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील ICICI बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटींचे कर्ज दिले होते. ज्यानंतर सहा महिन्यांनी वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्यूएबल्सला 64 कोटींचे कर्ज दिले होते. ज्यामध्ये दीपक कोचर यांचा 50% हिस्सा आहे.
ICICI बँक आणि व्हिडिओकॉनचे भागधारक अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र लिहून व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत आणि ICICI सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांनी एकमेकांना लाभ पोहचविण्याचा आरोप केला होता. धूत यांच्या कंपनी व्हिडिओकॉनला ICICI बँकेकडून 3250 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आणि त्या बदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या ऊर्जा कंपनीमध्ये पैसे गुंतवले.
ICICI बँकेच्या माजी CEO Chanda Kochhar आणि पतीला CBI कडून अटक
वेणुगोपाल धूत यांना लाभ पोहचविण्यासाठी…
चंदा कोचर यांनी आपल्या पतीच्या कंपनीसाठी वेणुगोपाल धूत यांना फायदा करून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 2018 मध्ये हा खुलासा झाल्यानंतर चंदा कोचर यांना बँकेतील आपल्या महत्त्वाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सीबीआयने यापूर्वी फेब्रुवारी 2018 मध्ये या प्रकरणी प्राथमिक चौकशी (PE) नोंदवली होती.
Bank Loan Fraud Case : एबीजी शिपयार्डसह प्रमोटर्सविरुद्ध ईडीने दाखल केला गुन्हा
2019 साली ICICI च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकार (CEO) चंदा कोचर यांच्याविरोधात आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण समितीचा अहवाल आला होता. कोचर यांनी व्हिडिओकॉनला कर्ज देताना बँकेच्या आचारसंहितेचा भंग केल्याचे समितीच्या चौकशीत आढळून आले की, व्हिडिओकॉनला कर्ज देताना कोचर यांनी बँकेच्या आचार संहितेचं उल्लंघन केलं आहे. कोचर यांच्या मान्यतेवर या कर्जाचा काही भाग त्यांचे पती दीपक यांच्या मालकीच्या कंपनीला देण्यात आला.
ADVERTISEMENT