कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात आणखी १५ दिवस लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना याबद्दलचे संकेत दिले आहेत. एकीकडे व्यापारी वर्गामधून लॉकडाउनला विरोध वाढत असताना सरकार टप्प्याटप्प्यात निर्बंध शिथील करण्याची परवानगी देऊ शकतं.
ADVERTISEMENT
मुंबई Unlock साठी तयार आहे का? तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे?
पुण्यात शनिवार-रविवार लॉकडाउनमध्ये काही तास सूट देण्यात आली आहे. याचपद्धतीने आगामी दिवसांत हळूहळू निर्बंध शिथील करण्याबद्दल विचार केला जाऊ शकतो असे संकेत टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. राज्याचा पॉजिटीव्हीटी रेट १० टक्क्यांच्या घरात असेल तर आपल्याला अजुन थोडा वेळ संयम ठेवणं गरजेचं आहे असंही टोपे म्हणाले. यावेळी बोलत असताना टोपे यांनी होम आयसोलेशनपासून ते लसीकरणाबद्दल माहिती दिली.
सध्या काही खासगी कंपन्या आणि हॉस्पिटल्स लसीकरण करत असून यासाठी ते जास्त दर आकारत आहेत. परंतू या परिस्थितीत राज्य सरकार त्यांना दर नियंत्रणात ठेवा अशी विनंती करु शकतं असंही टोपे यांनी सांगितलं. यावेळी बोलत असताना टोपे यांनी कंपन्यांनी स्वतःच्या खर्चाने कामगारांचं लसीकरण करावं असं आवाहन केलं. राज्यात लॉकडाउनचा नवा कालावधी १ जून ला जाहीर होईल. पुण्यात शनिवार-रविवार लॉकडाउनमध्ये सूट देण्यात आली असून येणाऱ्या काळात ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिकडे निर्बंध शिथील करण्याबाबत विचार केला जाईल असंही टोपे म्हणाले.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम?
ADVERTISEMENT