विद्यार्थ्यांनो घाबरु नका, Lockdown चा १० वी आणि १२ वी च्या परीक्षांवर परिणाम होणार नाही

मुंबई तक

• 05:22 AM • 05 Apr 2021

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारने सर्व व्यापार-उद्योगधंदे, सरकारी-खासगी कार्लायलं यांच्यासाठी नवीन नियम व निर्बंध घालून दिले आहेत. परंतू महाराष्ट्रात २९ एप्रिलपासून दहावीच्या तर २३ एप्रिलपासून बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील लॉकडाउनचा बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारने सर्व व्यापार-उद्योगधंदे, सरकारी-खासगी कार्लायलं यांच्यासाठी नवीन नियम व निर्बंध घालून दिले आहेत. परंतू महाराष्ट्रात २९ एप्रिलपासून दहावीच्या तर २३ एप्रिलपासून बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील लॉकडाउनचा बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही परीणाम होईल का याबद्दल अनेकांमध्ये संभ्रम होता. परंतू राज्य सरकारने या बाबतीत चित्र स्पष्ट करत दहावी आणि बारावीच्या सर्व परीक्षा या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचं म्हटलंय.

हे वाचलं का?

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना लॉकडाउनच्या नियमांमधून सूट देण्यात आली आहे. याचसोबत दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी काम पाहणाऱ्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सरकारने परिक्षेच्या आधी ४८ तास स्वतःची RTPCR कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे. १२ एप्रिलपासून राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा सुरु होणार असून आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आणि असाइनमेंट सबमिशन करायचं आहे. काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही पत्रकार परिषद घेऊन राज्यात लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली तरीही दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार नाही असं आश्वासन दिलं होतं.

यंदाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असून १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वाढवून दिला जाणार आहे. एरवी दहावी-बारावीच्या परीक्षा या सकाळी ११ वाजता सुरु होतात परंतू यंदाच्या वर्षी या परीक्षा साडे दहा वाजल्यापासून सुरु होणार आहेत. लॉकडाउन काळात विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाल्यामुळे यंदा अर्ध्या तासाची वेळ वाढवून देण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. याचसोबत ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनीटं वेळ वाढवून देण्यात आली आहे.

कोरोना काळात मुलांना प्रवास करावा लागू नये यासाठी त्यांच्यात शाळेत त्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. जर एखाद्या शाळेत मुलांना बसण्याची पुरेशी व्यवस्था नसेल तर त्या मुलांची जवळील शाळेत सोय करण्यात येणार आहे. याव्यतिरीक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्व पेपरसाठी १ तास वाढवून देण्यात आला आहे, तर प्रॅक्टीकलच्या परीक्षा या गृहपाठ पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. कोरोना काळात विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे…यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असं आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिलंय.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल करण्याची फारशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ५ ते ६ प्रॅक्टीकलच्या आधारावरच घेतली जाणार आहे. आर्ट्स आणि कॉमर्स शाखेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांत Assignment सादर करावं लागणार आहे. दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं घर कन्टेन्मेंट झोनमध्ये असेल तर त्यांना आपली Assignment सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.

याचसोबत एखाद्या विद्यार्थ्याला जर परीक्षेदरम्यान कोरोनाची लागण झाली किंवा परीक्षेदरम्यान त्याच्यात कोरोनाची लक्षणं दिसून आली तर त्याची परीक्षा जून महिन्यात घेण्यात येईल. याचसोबत कन्टेन्मेंट झोन मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना जर परीक्षा देणं शक्य होणार नसेल तर त्यांची परीक्षाही जून महिन्यात घेतली जाईल.

    follow whatsapp