बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना ! ममतांचं कौतुक करणाऱ्या राज्यातल्या नेत्यांना फडणवीसांचा टोला

मुंबई तक

• 01:04 PM • 02 May 2021

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करुन भाजपचं आव्हान मोडून काढलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा अशा दिग्गज नेत्यांच्या फौजेचा सामना करत ममता बॅनर्जींनी राज्यात विजय मिळवला. या विजयानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी ममता दीदींचं अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. Pandharpur By-election Result: पंढरपुरात भाजपकडून राष्ट्रवादीचा […]

Mumbaitak
follow google news

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करुन भाजपचं आव्हान मोडून काढलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा अशा दिग्गज नेत्यांच्या फौजेचा सामना करत ममता बॅनर्जींनी राज्यात विजय मिळवला. या विजयानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी ममता दीदींचं अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

Pandharpur By-election Result:
पंढरपुरात भाजपकडून राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’, समाधान आवताडेंचा निर्णायक विजय

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम बंगालच्या निकालांवरुन ममता बॅनर्जींचं कौतुक करणाऱ्या राज्यातल्या नेत्यांना टोला लगावला आहे. “बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना हे मी आतापर्यंत ऐकलं होतं पण आता पाहतो ही आहे. आज मी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिक्रिया पाहतो आहे. दुसऱ्यांच्या घरी मुल जन्माला आल्यानंतर इतकी मिठाई वाटत आहेत इतके ढोल वाजवत आहेत…की बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना हे आजपर्यंत ऐकलं होतं पण आज पहायलाही मिळालं.”

खरंतर काँग्रेसची अवस्था काय झाली हे आपण पाहिलं, शिवसेनेचं तर काही अस्तित्वच नाहीये…राष्ट्रवादी आजच पंढरपूरमध्ये हरली आहे. पण ममता बॅनर्जींचा विजय हा जणू काही आपलाच विजय आहे असं दाखवलं जातंय, हा अविर्भाव सर्वांनाच समजतो. बंगालच्या निवडणूकीमुळे एक गोष्ट चांगली झाली की इव्हीएमबद्दल आता कोणी बोलणार नाही, असा उपरोधित टोला फडणवीसांनी लगावला.

West Bengal Election Counting : भाजपच्या गद्दारीला लोकांनी चपराक दिली आहे – शिवसेना

ज्या राज्यात आमचं अस्तित्वच नव्हतं. मागच्या वेळी जिकडे आमच्या ३ जागा आल्या होत्या तिकडे आम्ही चॅलेंजर म्हणून उभे राहिलो. ममता बॅनर्जींचीही दमछाक झाली आहे. यापूर्वी पश्चिम हंगाल हे काँग्रेस आणि डाव्या विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जायचं तिकडे आता हिंदूत्व आणि भगव्याचा बोलबाला सुरु झाला आहे, असं सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.

संजय राऊत म्हणतात दीदी ओ दीदी…पवारांनीही दिल्या शुभेच्छा, राज्यातील नेत्यांकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

    follow whatsapp