तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी तिचा खास मित्र आणि ‘अली बाबा’ मालिकेतील अभिनेता शीजान खान याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या मालिकेचे शूटिंग जून 2022 पासून सुरू आहे. तुनिषा शीजानसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण 15 दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले, त्यामुळे अभिनेत्री तणावात होती. आतापर्यंतच्या तपासात काय समोर आले आहे, हेही पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
या संपूर्ण प्रकरणात मोठी गोष्ट म्हणजे पोलिसांनी लव्ह जिहादचा अँगल पूर्णपणे फेटाळून लावला आहे. मुंबई पोलिसांचे एसीपी चंद्रकांत जाधव म्हणाले की, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि आतापर्यंतच्या तपासानुसार ब्रेकअपचा धक्का सहन न झाल्याने तुनिषाने आत्महत्या केली. तुनिषाला ब्लॅकमेल केल्याचा कोणताही अँगल अद्याप समोर आलेला नाही.
शीजानाचा मोबाईल जप्त
शनिवारी तुनिषाने ‘अलिबाबा : दास्तान-ए-काबुल’च्या सेटवर शीझानच्या मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. तुनिषाच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अभिनेत्रीचा माजी प्रियकर शीजान खान याला अटक केली. एसीपी चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की, आम्ही कोर्टाकडे सात दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र चार दिवसांची कोठडी मिळाली. शीजानला पोलिसांनी आयपीसी ३०६ अंतर्गत अटक केली आहे. त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टचे सत्य
पोलिसांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तुनिषाचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. सर्व अफवा फेटाळून लावत एसीपी म्हणाले की, तुनिषा गरोदर नव्हती. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. ती फक्त आत्महत्या होती. पोलिसांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या तपासानुसार तुनिषाने ब्रेकअपमुळे आत्महत्या केली. शीजानसोबत ब्रेकअप झाले असून तो माझ्याशी बोलत नसल्याचे तुनिशाने तिच्या आईला सांगितले होते. त्यामुळे अभिनेत्री या तणावात होती, असं पोलीसांनी सांगितलं.
सर्वांची चौकशी होणार – पोलीस
एसीपी म्हणाले की, तुनिषाच्या मृत्यूला लव्ह जिहादचा कोणताच अँगल नाही. नुकतीच कोठडी मिळाली असल्याने आरोपीची अद्याप चौकशी झालेली नाही. पुढील तपासात कुटुंबातील सर्व सदस्य आणि तज्ज्ञांचीही चौकशी केली जाईल. सेटवर काम करणाऱ्या लोकांकडूनही चौकशी केली जाणार आहे. सर्वांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत. उर्वरित तपास यावर अवलंबून असेल. तुनिषाचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे सध्या स्पष्ट झाले आहे, असं पोलीस म्हणाले.
ADVERTISEMENT