कारला धडकून लक्झरी बस उलटली, हॉटेलमध्ये बस घुसल्याने २५ जण जखमी

मुंबई तक

• 08:23 AM • 11 Apr 2022

एका कारला लक्झरी बस धडकून एक भीषण अपघात पुण्यात झाला आहे. १० एप्रिलच्या रात्री ११ नंतर बजरंगवाडी शिरूर या ठिकाणी हा अपघात झाला आहे. पुणे अहमदनगर महामार्गाच्या पुणे बाजूकडे जाणाऱ्या रोडवर एका कारवर ही बस धडकली. बस चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ही बस कार […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

एका कारला लक्झरी बस धडकून एक भीषण अपघात पुण्यात झाला आहे. १० एप्रिलच्या रात्री ११ नंतर बजरंगवाडी शिरूर या ठिकाणी हा अपघात झाला आहे. पुणे अहमदनगर महामार्गाच्या पुणे बाजूकडे जाणाऱ्या रोडवर एका कारवर ही बस धडकली. बस चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ही बस कार आणि महामार्गावरच्या कठड्याला धडकली. त्यानंतर एका हॉटेलच्या दारातही घुसली.

हे वाचलं का?

पुण्यात झालेल्या या अपघातात २२ ते २५ जण जखमी झाले आहेत. त्यातले ५ जण गंभीर असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लक्झरी बसचा चालकही या अपघातात जखमी झाला आहे. ती धडक जोरात असल्याने बस उजव्या बाजूने उलटली आणि घासत जाऊन अहमदनगर बाजूच्या रोडवर असलेल्या रॉयल पॅलेस हॉलेटच्या मुख्य दरवाजात घुसली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

    follow whatsapp