ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फॅशन गेम हा नेहमी ऑन पाईंट असतो.
माधुरी नवनवे फॅशनचे खास कपडे नेहमीच परिधान केलेली पाहायला मिळते
माधुरीने आपल्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती फिकट गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केलेला आहे.
डिझानर Mishru ने डिझाइन केलेला हा फ्लोरल लेहंगा वेडिंग आणि फेस्टिव्ह सीजनमध्ये परिधान करण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे.
मिरर वर्ड अँब्रॉयडरी आणि थ्रेडवर्क हे या लेहंग्याला खूप सुंदर लूक देतं.
या ड्रेससोबत माधुरीने हेवी ड्रॉप पिंक-गोल्डन झुमके, रिंग परिधान केल्या आहेत.
माधुरीने याआधी देखील लेहंग्यामधील फोटोशूट केलं आहे.
माधुरी दीक्षित ही सध्या डान्स रियालिटी शो डान्स दीवाने 3 मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे.
याआधी माधुरीने अनेक डान्स शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे.
या लेहंगा लूकमध्ये देखील माधुरीच्या अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करुन जाणाऱ्या आहेत.
माधुरीचा हा लेहंगा लूक तुम्हाला पण आवडला ना?
ADVERTISEMENT