महाराष्ट्रात राजकीय पक्षांचे मेळावे जोरात, सत्तारूढ पक्षांचे मोर्चे जोरात, अशावेळी निर्बंध हे फक्त शिवजयंतीवर का? असा प्रश्न मला पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवावर निर्बंध लादणं चुकीचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवजयंतीवरचे निर्बंध, 75 लाख लोकांच्या वीजतोडण्या कापून सर्वसामान्यांचा छळ हे सगळं सुरू आहे. हा सगळा कारभार म्हणजे मोगलाईच आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जनतेच्या मागे लॉकडाऊननंतर सरकारने उभं राहायला हवं होतं त्याऐवजी जनतेचा छळ सुरू आहे मोगलाई यापेक्षा वेगळी काय होती असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
कोरोना आहे, त्यासंबंधीच्या काळजी घेतलीच पाहिजे मात्र कोरोनाची आठवण ही फक्त शिवजयंतीच्या दिवशीच का होते? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती या निमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा कारभार म्हणजे मोगलाई आहे अशी टीका केली आहे.
पाहा नेमकं काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पेट्रोल आणि डिझेलवर महाराष्ट्र सरकारने लावलेले कर हे जास्त आहेत. आमचं सरकार असताना हे कर आम्ही कमी केले होते. मात्र ठाकरे सरकारने टॅक्स वाढवले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महाग झालं आहे महाराष्ट्र सरकारने ते टॅक्स कमी करावेत म्हणजे दर कमी होतील. केंद्र सरकारने जे धोरण इंधन करांच्या बाबतीत राबवलं तसंच राज्य सरकारने राबवलं पाहिजे तर या दर कमी होतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT