महाभारत या गाजललेल्या मालिकेत कृष्ण ही भूमिका साकारून ती अजरामर करणाऱ्या नितीश भारद्वाज यांचा आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाला आहे. 12 वर्षांचं दोघांचं नातं संपुष्टात आलं आहे. नितीश भारद्वाज आणि त्यांची पत्नी स्मिता या दोघांचा घटस्फोट झाला आहे. 2019 मध्येच या दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं. आता या दोघांनी डिव्होर्स घेतला आहे. या दोघांना जुळ्या मुली आहेत. त्या आई स्मितासोबत इंदूर या ठिकाणी राहतात.
ADVERTISEMENT
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नितीश भारद्वाज यांनी सांगितलं की, ‘होय मी फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी 2019 मध्ये अर्ज दिला होता. मला आता या विषयाच्या खोलात शिरायचं नाही की आमचा डिव्होर्स का झाला. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही जास्त भयंकर असतो. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही आयुष्यात एक रिकामेपण सोसत असता’
नितीश भारतद्वाज हे म्हणाले की मी लग्नसंस्थेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मात्र माझ्याबाबतीत मी कमनशिबी आहे. लग्न तुटण्याची अनेक कारणं अनेक असू शकतात. कितीतरी वेळा तुम्ही तुमच्या साधीदाराच्या अॅटीट्युडसोबतही तडजोड करू शकत नाही. कधी कधी अहंकार आडवा येतो. तर कधी कधी विचार जुळत नाही. जेव्हा लग्न तुटतं तेव्हा त्याचा सगळ्यात मोठा परिणाम मुलांवर होतो. मुलांवर या गोष्टीचा वाईट परिणाम होतो. त्याची जबाबदारी आई वडिलांचीच असते असंही नितीश यांनी म्हटलं आहे.
नितीश भारद्वाज यांनी महाभारत या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. तसंच त्यांनी मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. मोंहेजेदारो या सिनेमात अनेक वर्षांनी त्यांनी काम केलं होतं. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक झालं. तसंच समांतर या मराठी वेबसीरिजमध्येही त्यांनी सुदर्शन चक्रपाणी ही भूमिका केली होती. त्यांच्या या भूमिकेचं चांगलंच कौतुक लोकांनी केलं होतं.
ADVERTISEMENT