अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. अशात आता या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या मृत्यू प्रकरणाचा आणि पालघर साधू हत्याकांडाचा संबंध असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच हे प्रकरण गंभीर आहे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. हत्या आणि आत्महत्या या दोन्ही फारसं अंतर नाही. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं हा देखील हत्येचाच एक प्रकार आहे असंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काय म्हटलं आहे?
‘मला असं वाटतं की पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड हा विषयही गंभीर होता. त्या प्रकरणाचा २० सप्टेंबरला घडलेल्या महंत नरेंद्र गिरी प्रकरणाशी संबंध आहे असं मला वाटतं आहे. मला या प्रकरणी फक्त शक्यता वाटत नाही तर खात्री वाटते आहे की या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे.’
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. वाघम्बरी मठामध्ये नरेंद्र गिरी यांचा मृतदेह आढळला आहे. असं सांगितलं जातं आहे की त्यांच्या खोलीतून सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिष्य आनंद गिरी यांच्यावर त्रास देण्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
काय आहे कथित सुसाईडनोटमध्ये?
प्रयागराज पोलिसांनी हा दावा केला आहे की महंत नरेंद्र गिरी महाराजांच्या खोलीतून जी सुसाईड नोट मिळाली त्यामध्ये त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यासहीत काही इतर नावं आहेत. एवढंच नाही तर यामध्ये असं लिहिलं गेलं आहे की नरेंद्र गिरी का दुःखी होते? त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला हे देखील या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र गिरी महाराजांनी लिहिलेली सुसाईड नोट ही सात ते आठ पानांची आहे.
आयजी प्रयागराज के पी सिंह यांनी असं म्हटलं आहे की सुसाईड नोट एखाद्या इच्छापत्राप्रमाणे लिहिण्यात आली आहे. यामध्ये आनंद गिरी यांच्यासहीत इतर काही जणांची नावं आहेत.या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT