ADVERTISEMENT
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा वाढविण्यास मान्यता. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)
मुंबईतील मनोरी (ता. बोरीवली) येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षासाठी नुतनीकरण करण्याचा निर्णय. (महसूल विभाग)
तिरुपती देवस्थानाला नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारणीसाठी भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. (नगरविकास विभाग)
पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा-१ची विस्तारित मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. (नगरविकास विभाग)
महसूल वाढीसाठी विद्यमान एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. (गृह विभाग)
काजूबोंडे, मोहफुले यापासून तयार करण्यात येणाऱ्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा बैठकीत घेण्यात आला. (गृह विभाग)
ADVERTISEMENT