पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे; एकनाथ शिंदेंचा इशारा, ‘शिवरायांच्या भूमीत हे…’

मुंबई तक

• 01:14 PM • 24 Sep 2022

पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित लोकांना एनआयए आणि ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर पुण्यात शनिवारी पाकिस्तान जिंदाबादची नारे देण्यात आल्याचा प्रकार घडल्याचं समोर आलं. या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये. ‘शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत’, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर एनआयए आणि ईडीने धाडी टाकल्या. […]

Mumbaitak
follow google news

पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित लोकांना एनआयए आणि ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर पुण्यात शनिवारी पाकिस्तान जिंदाबादची नारे देण्यात आल्याचा प्रकार घडल्याचं समोर आलं. या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये. ‘शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत’, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

हे वाचलं का?

पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर एनआयए आणि ईडीने धाडी टाकल्या. या प्रकरणात महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली असून, या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळचे काही व्हिडीओ समोर आले असून, या व्हिडीओच्या आधारे आंदोलकांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यावर, पोलिसांकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही.

दरम्यान, या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटलंय की, ‘पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत’, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय.

पीएफआय प्रकरण काय? एनआयए आणि ईडीने धाडी का टाकल्या?

एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) २२ सप्टेंबर रोजी देशभरात छापे टाकले. या प्रकरणात शंभराहून अधिक लोकांना अटक करण्यात आलेलं आहे. टेरर फंडिंग प्रकरणात एनआयए आणि ईडीने ही कारवाई केलीये.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया देशातील तीन संघटनांनी मिळून निर्माण झालेली संघटना आहे. ती २२ नोव्हेंबर २००६ रोजी अस्तित्वात आली. यात केरळमधील नॅशनल डेमोक्रटिक फ्रंट, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि तामिळनाडूतील मनिता नीती पसरई या संघटनांचा समावेश आहे.

पीएफआयकडून त्यांच्या संघटनेबद्दल कोणतीही माहिती जाहीर केलेली नाहीये. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशातील २० राज्यात शाखा आहेत. सुरुवातीला पीएफआयचं मुख्यालय केरळातल्या कोझिकोडमध्ये होतं. नंतर ते दिल्लीत हलवण्यात आलं. ओएमए सलाम हे त्याचे अध्यक्ष आहेत, तर ईएम अब्दुल रहिमान उपाध्यक्ष आहेत.

    follow whatsapp