मुंबई: कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोककलावंतांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ठाकरे सरकार लोककलाकारांना 5000 रुपयांची मदत करेल. या निर्णयामुळे राज्यातील किमान 56 हजार कलाकारांना आर्थिक मदत मिळणार आहे.
ADVERTISEMENT
लोककलाकारांना कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी राज्य सरकारकडून हे एकवेळचे अनुदान दिले जात आहे.
राज्य सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात राज्यातील शेकडो लोककलाकार, ऑपरेटर, मालक आणि लोककला मंडळांचे निर्माते मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. हे पाहता, कलाकारांना एक वेळचा कोव्हिड अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य सरकार याबाबत जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात सविस्तर प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र गेल्या दीड वर्षांपासून कोव्हिड-19 महामारीशी लढत आहे. कोव्हिड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे अनेक कलाकार आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत आहेत. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 56,000 कलाकारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
28 कोटी होणार खर्च
रिपोर्टनुसार, सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे सुमारे 8,000 कलाकार आहेत आणि राज्याच्या उर्वरित भागात सुमारे 48,000 कलाकार राहत आहेत. या सर्व कलाकारांना आर्थिक मदत दिली जाईल. प्रत्येक कलाकाराला पाच हजार रुपये दिले जातील. या निर्णयानंतर सरकारच्या तिजोरीवर 28 कोटींचा भार पडणार आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर करतेय कोरोना रूग्णांची मदत; ‘त्या’ घटनेनंतर घेतला निर्णय
राज्यात प्रायोगिक कलेच्या क्षेत्रात विविध कला मंडळे कार्यरत आहेत. कोव्हिड-19 च्या साथीमुळे एका वर्षापेक्षा जास्त काळ काम उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
कोव्हिड अनुदानाच्या अंतर्गत शाहिरी, संगीतबारी, तमाशा फड पूर्ण वेळ, तमाशा फड-हंगामी, दशावतार, नाटक, विधिनाट्य, सर्कस आणि टूरिंग टॉकीज अशा सुमारे 847 संस्थांच्या कलाकारांना मदत केली जाणार आहे. कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकारांची निवड आणि राज्यातील इतर आकस्मिकता यावर एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
ADVERTISEMENT