महाराष्ट्रात दिवसभरात 13 हजार 452 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 65 हजार 644 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.27 टक्के झालं आहे. आज दिवसभरात राज्यात 7 हजार 761 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात दिवसभरात 167 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.4 टक्के इतकं झालं आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 50 लाख 39 हजार 617 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 97 हजार 18 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 85 हजार 967 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 576 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 1 हजार 337 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 7 हजार 761 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची 61 लाख 97 हजार 18 एवढी झाली आहे.
10 हजारांपेक्षा जास्त रूग्णसंख्या असलेले जिल्हे
मुंबई – 10 हजार 993
ठाणे- 15 हजार 826
पुणे- 17 हजार 96
मुंबई, ठाणे, पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये रूग्णसंख्या 10 हजारांपेक्षा जास्त आहे. प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 17 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे जिल्ह्यात देखील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 15 हजारांच्या वर आहे.
मुंबईत आज 446 नवे रूग्ण
मुंबईत आज दिवसभरात 446 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर मुंबईत दिवसभरात 470 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 5 हजार 234 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईचा डबलिंग रेट 951 दिवस इतका झाला आहे. मुंबईत 6 हजार 973 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
ADVERTISEMENT