महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 157 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 04:46 PM • 01 Aug 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 110 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 60 लाख 94 हजार 896 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.59 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात 6 हजार 749 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज 157 कोरोना बाधित रूग्णांच्या […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 110 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 60 लाख 94 हजार 896 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.59 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात 6 हजार 749 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज 157 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातला मृत्यू दर हा 2.1 टक्के एवढा झाला आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 81 लाख 85 हजार 350 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 10 हजार 194 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 67 हजार 986 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3 हजार 117 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 78 हजार 962 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 6 हजार 469 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 63 लाख 10 हजार 194 इतकी झाली आहे.

29 जुलैला आरोग्य विभाग, टास्क फोर्स यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत असा निर्णय झाला. या निर्णयाबाबत सरकार सकारात्मक आहे असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. राजेश टोपे यांना केरळमध्ये वाढलेल्या रूग्णसंख्येबाबत आणि तिसऱ्या लाटेबाबत प्रश्न विचारला असता राजेश टोपे म्हणाले केरळमध्ये रूग्णसंख्या वाढली ही चिंतेची बाब नक्कीच आहे. तिथे तिसरी लाट सुरू झाली असण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रात तशी स्थिती नाही. मात्र तिसरी लाट आली तर ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड, बालरोग तज्ज्ञांची टीम आणि सुसज्ज आरोग्य व्यवस्था अशी आपली सगळी तयारी झाली आहे. तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. पण तिसरी लाट आलीच तर त्या लाटेला लढा देण्यासाठी आपण सज्ज आहोत असंही राजेश टोपेंनी सांगितलं.

25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं राजेश टोपे यांनी सांगितलं असलं तरीही उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध म्हणजेच जे आत्ता सुरू आहेत ते निर्बंध कायम राहतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध?

पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, अहमदनगर या अकरा जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे निर्बंध असतील. जर गरज पडली तर तिथल्या स्थानिक प्रशासनाने निर्बंध कडक करण्याची गरज असेल तर तसंही करा अशा सूचना देण्यात आले आहेत. लग्न किंवा समारंभ याबाबत काही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मी सगळी यादी सांगणार नाही. मात्र टास्क फोर्स आणि आम्ही शिफारस केली आहे. याबाबत आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

    follow whatsapp