महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 48 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 03:53 PM • 22 Sep 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 285 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात 3068 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 48 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात राज्यात 4 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 49 हजार 29 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्याचा मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका झाला […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 285 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात 3068 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 48 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात राज्यात 4 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 49 हजार 29 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्याचा मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका झाला आहे.

हे वाचलं का?

आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 74 लाख 76 हजार 142 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 31 हजार 237 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 2 लाख 64 हजार 416 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1678 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात आज घडीला 39 हजार 984 सक्रिय रूग्ण आहेत.

मुंबईत 488 नवे रूग्ण

मुंबईत 488 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 359 रूग्णांना दिवसभरात डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईचा डबलिंग रेट 1187 दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या 4706 नवे रूग्ण आहेत.

पुण्यात 170 नवे रूग्ण

पुण्यात 170 नवे रूग्ण आढळले आहेत. 192 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात एका मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात 1573 सक्रिय रूग्ण आहेत.

    follow whatsapp