कोकणात रिफायनरीचा वाद पेटणार? सहा विरोधकांना हद्दपार करण्याचा पोलिसांचा प्रस्ताव

मुंबई तक

• 02:40 PM • 01 Nov 2022

रिफायनरीवरून कोकणात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. रिफायनरी विरोधाबरोबरच पाठिंबाही वाढतो आहे. दरम्यान काही रिफायनरी विरोधकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले होते, मात्र गुन्हे दाखल होऊनही प्रवृत्तीत सुधारणा झालेली नाही. या वर्तनामुळे राजापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोवळ, बारसू शिवणेखुर्द या परिसरातील शांतताप्रिय जनतेच्या जिवितास धोका , भय आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असून लोकांना जीवन […]

Mumbaitak
follow google news

रिफायनरीवरून कोकणात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. रिफायनरी विरोधाबरोबरच पाठिंबाही वाढतो आहे. दरम्यान काही रिफायनरी विरोधकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले होते, मात्र गुन्हे दाखल होऊनही प्रवृत्तीत सुधारणा झालेली नाही. या वर्तनामुळे राजापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोवळ, बारसू शिवणेखुर्द या परिसरातील शांतताप्रिय जनतेच्या जिवितास धोका , भय आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असून लोकांना जीवन जगणं असाह्य झालंय असं म्हणत पोलीस निरीक्षक राजापूर यांनी 6 जणांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

हे वाचलं का?

रिफायनरीला विरोध करणाऱ्यांना तडीपारीची नोटीस

त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजित चव्हाण ,नरेंद्र जोशी, अमोल बोळे ,नितीन जठार ,दीपक जोशी ,सतीश बाने यांना तडीपारची कारवाई का करू नये यासाठी नोटीस देण्यात आली आहे. मात्र तडीपार करण्याचा प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाहीये.

या सर्व व्यक्तींवर तडीपार कारवाई करण्याआधी त्यांना समक्ष बोलून याबाबत विचारणा करण्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. आपले म्हणणे मांडण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा यांचे समक्ष हजर राहण्या बाबत नोटीस देण्यात आली आहे.

नोटीस मध्ये काय म्हटलं आहे ?

तुम्ही सत्यजित विश्वनाथ चव्हाण रा.चव्हाणवाडी राजापूर ता . राजापूर , जि . रत्नागिरी , तुम्हास महाराष्ट्र पोलीस कायदा सन १ ९ ५१ चे कलम ५ ९ ( १ ) अन्वये कळविण्यात येते की , तुमचेवर खालीलप्रमाणे आरोप आहेत . त्यामुळे जेणेकरुन तुमच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ ( १ ) ( अ ) अन्वये कार्यवाही चालावी याबाबतचे आरोप अभिकथन , सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे आहेत . महाराष्ट्र पोलीस कायदा सन १ ९ ५१ चे कलम ५ ९ ( १ ) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी , राजापूर यांनी त्यांचेकडील आदेश क्रमांक हद्दपार / एसआर -०३ / २०२२ दि . १०/१०/२०२२ अन्वये मला अधिकार दिल्याप्रमाणे…

मी सदाशिव वाघमारे , उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी पदभार लांजा उपविभाग, अशी सूचना देतो की , तुमचे विरुध्द अभिकथन पत्रातील नमुद गुन्हे दाखल होऊनही तुमचे प्रवृत्तीत सुधारणा झालेली नाही . तुमचे या वर्तनामुळे राजापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोवळ , बारसू शिवणेखुर्द ता . राजापूर या परिसरातील शांतताप्रिय जनतेच्या जिवितास धोका , आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असून लोकांना जगणं अशक्य झालं आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक राजापूर यांनी तुम्हाला हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे.

खुलासा करायचा असेल तर काय पर्याय?

त्यापूर्वी तुम्हास खुलासा करावयाचा असल्यास , तुमचे बचावाचे २ साक्षीदार व १ जामिनदार पासपोर्ट साईजचे प्रत्येकी ०२ फोटो , रक्कम रुपये १० / – किमतीचे न्यायालयीन डाकमुद्रांक व आधारकार्डचे छायांकित प्रतीसह दिनांक ०२/११/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा पर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय लांजा , गोंडेसखल रोड ता . लांजा , जि . रत्नागिरी येथे न चुकता हजर रहावे . आपणास वेळोवेळी चौकशीसाठी ठरविलेल्या तारखांना बिनचुक हजर राहण्यासाठी तुम्ही रक्कम रु .५००० / – चा जात मुचलका व तेवढ्याच रक्कमेच्या जामिनदारासह आमचे कार्यालयात हजर राहून जबाब दयावा . आपण हजर राहून जबाब लिहून दिला नाही तर तुमचे विरुध्द वरील चौकशीचे कामकाज सुरु राहील व त्याचे परिणामास तुम्ही पात्र रहाल. असं नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे.

    follow whatsapp