नवाब मलिकांना ईडीचा दणका! दाऊदच्या बहिणीकडून विकत घेतलेल्या मालमत्तेवर टाच

दिव्येश सिंह

• 09:46 AM • 13 Apr 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. दाऊदच्या बहिणीकडून विकत घेतलेली मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. २००२ च्या मनी लाँड्रींग प्रकरणातली ही करवाई आहे. नवाब मलिक यांची ED कोठडीतून आर्थर तुरुंगामध्ये रवानगी या प्रकरणी NIA ने FIR ३ फेब्रुवारीला दाखल केली होती त्यानंतर आयपीसी सेक्शन १७, १८, […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. दाऊदच्या बहिणीकडून विकत घेतलेली मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. २००२ च्या मनी लाँड्रींग प्रकरणातली ही करवाई आहे.

हे वाचलं का?

नवाब मलिक यांची ED कोठडीतून आर्थर तुरुंगामध्ये रवानगी

या प्रकरणी NIA ने FIR ३ फेब्रुवारीला दाखल केली होती त्यानंतर आयपीसी सेक्शन १७, १८, २०,२१, ३८ आणि ४० अंतर्गत हा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणी चौकशी सुरू केली. नवाब मलिक यांना अटकही करण्यात आली आहे.

या FIR मध्ये दाऊद इब्राहीम, दाऊद भाई हाजी अनीस, अनीस इब्राहीम शेख, छोटा शकील, जावेद पटेल, जावेद चिकना, इब्राहीम मुश्ताक अब्दुल रजाक मेमन, टायगर मेमन यांची नावं आहेत. दाऊद भारताबाहेर पळून गेला तेव्हा त्याने हसीना पारकर आणि इतर साथीदारांच्या मदीतने मुंबईतल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या.

नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून…. काय म्हणाले शरद पवार?

कोणकोणत्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत?

गोवावाला कंपाऊंड, कुर्ला पश्चिम

कमर्शियल युनिट, कुर्ला पश्चिम

तीन फ्लॅट, कुर्ला, पश्चिम

दोन राहती घरं, वांद्रे, पश्चिम

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेली १४७.७९४ एकर जमीन

या सगळ्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

देवेंद्र फडणवीस आठ वर्षांपासून शिवसेनेला संपवण्याचं राजकारण करत आहेत-नवाब मलिक

गुन्ह्यांचा तपास करत असतानाच नवाब मलिक यांचं जमीन खरेदी बाबतचं प्रकरण समोर आलं आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच त्यांना अटक करण्यात आली आहे. आता नवाब मलिक यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना हा मोठा झटका मानला जातो आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार जवळपास ११ कोटींपेक्षा जास्त रक्कम या संपत्तीतून नियंत्रित केली जात होती. सॉरीडोस नावाची एक कंपननी आहे. मलिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या कंपनीला पैसे दिले होते. ईडीच्या चौकशीत या कंपनीचा आणि पैशांचा संबंध दाऊदशी आहे तिथूनच हे सगळे पैसे आले आणि ही मालमत्ता विकत घेतली गेली असा दावा ईडीने केला आहे.

    follow whatsapp