Aditya Thackeray : “एका माणसाच्या राक्षसी महत्वांकाक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतो आहे”

मुंबई तक

30 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:36 AM)

एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुले महाराष्ट्र मागे पडतो आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे उपस्थित करायचे? यावर चर्चा झाल्याचं समजतं आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी? एका […]

Mumbaitak
follow google news

एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुले महाराष्ट्र मागे पडतो आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे उपस्थित करायचे? यावर चर्चा झाल्याचं समजतं आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?

एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतो आहे. उदय सामंत उद्योग मंत्री आहेत, पण त्यांना उद्योग मंत्री म्हणून काम करताना मी कधीही पाहिलेलं नाही. राज्य सरकारने त्यांना या प्रक्रियेतून बाहेर ठेवलं आहे. ज्यांचा या खात्याशी संबंधच नाही ते उत्तरं का देत आहेत? ज्यांना मी प्रश्न विचारले आहेत, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी आव्हान दिलं आहे. तुम्ही मंचावर बसा, मीडिया बोलवा आणि माझ्यासमोर डिबेट करा असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा दिलं आहे.

महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे

महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात द्वेष पसरवला जातो आहे. एकीकडे या सगळ्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं तर दुसरीकडे त्यांच्याच प्रसंगाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली जाते. या सगळ्यातून महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मला वाटतं असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

गोवरवर सरकार काहीही उपाय योजना करताना दिसत नाही

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गोवर या आजाराचं प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. प्रामुख्याने लहान मुलांना या आजाराचा विळखा पडल्याने चिंता व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात गोवरमुळे १२ मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र राज्य सरकार यावर कोणत्याही उपाय योजना करताना दिसत नाही. आम्ही कोव्हिडच्या काळात ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती तसे प्रयत्नही सरकारकडून होताना दिसत नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

सध्याचं घटनाबाह्य सरकार असून मुख्यमंत्री देखील घटनाबाह्य आहेत. हे खोके सरकार आहे. या सरकारचा महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा प्लान आहे. एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागं पडतोय. कोणत्याही खात्याशी संबंध नसलेले उत्तर का देतात, मुख्यमंत्री का समोर येत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ज्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्यांना पदमुक्त करायला हवं होतं; पण तसं घडलं नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

    follow whatsapp