महाराष्ट्रात दिवसभरात 3105 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 50 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात 3164 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 74 हजार 892 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.27 टक्के झाले आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 89 लाख 10 हजार 564 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 53 हजार 961 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 41 हजार 110 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात आज घडीला 36 हजार 371 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 3105 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 53 हजार 961 इतकी झाली आहे.
मुंबईत 24 तासात 418 नवे रूग्ण
मुंबईत 24 तासात 418 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर 360 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 19 हजार 992 रूग्ण कोरोनामुत्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 97 टक्के झाला आहे. मुंबईत सध्याच्या घडीला 4 हजार 810 सक्रिय रूग्ण आहेत.
20 सप्टेंबरला सात महिन्यांमधली निचांकी संख्या
20 सप्टेंबरला म्हणजेच मागच्या सोमवारी सर्वात कमी रूग्णसंख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली होती. 2583 रूग्ण गेल्या सोमवारी दिवसभरात पॉझिटिव्ह होते. 21 सप्टेंबरला समोर आलेली रूग्णसंख्या यापेक्षाही कमी आहे.
राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहं सुरू होणार
राज्यात ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळं उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध नियमावली ठरवून देत सरकारने या दोन्ही गोष्टींवरील निर्बंध सैल केले आहेत.त्यानंतर आता बंद असलेली सिनेमागृहे आणि नाट्यगृहे यांनाही परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
‘कोरोना म्हणजे थोतांड’, मास्कविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाचा Covid-19 मुळेच मृत्यू
राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही शैक्षणिक वर्षाची सुरूवात ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून करण्यात आली होती. दरम्यान, शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, निर्णय स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर अखेर सरकारने शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.
राज्यात मंदिरं सुरू करण्याचा निर्णय
राज्यात मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत.
ADVERTISEMENT