महाराष्ट्रात दिवसभरात 16 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 295 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 03:22 PM • 08 Jun 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 16 हजार 577 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 55 लाख 80 हजार 925 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात Recovery Rate 95.35 टक्के इतके झाले आहे. तर आज राज्यात 10 हजार 891 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. राज्यात 295 कोरोना […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 16 हजार 577 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 55 लाख 80 हजार 925 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात Recovery Rate 95.35 टक्के इतके झाले आहे. तर आज राज्यात 10 हजार 891 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. राज्यात 295 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के इतका झाला आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 69 लाख 7 हजार 181 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 52 हजार 891 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11 लाख 53 हजार 147 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 6 हजार 225 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,67,927 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज राज्यात 10,891 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 58 लाख 52 हजार 891 झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 295 मृत्यूंपैकी 208 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 87 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 407 ने वाढली आहे. हे 407 मृत्यू, ठाणे-63, पुणे-54, नाशिक-52, अकोला-30, सांगली-29, सातारा-22, यवतमाळ-22, अहमदनगर-19, नागपूर-16, रायगड-15, औरंगाबाद-12, चंद्रपूर-11, कोल्हापूर-9, रत्नागिरी -8, नांदेड -6, उस्मानाबाद-6, सिंधुदुर्ग-6, सोलापूर-6, भंडारा-4, लातूर-4, जालना-3, अमरावती-2, बीड-2, जळगाव-2, परभणी-2, गडचिरोली-1 आणि गोंदिया-1 असे आहेत.

10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेले जिल्हे

मुंबई – 17 हजार 642

ठाणे – 15 हजार 724

पुणे- 20 हजार 747

सातारा- 12 हजार 461

कोल्हापूर- 18 हजार 551

महाराष्ट्रातले पाच जिल्हे असे आहेत जिथे 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट आता 95 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तसंच महाराष्ट्रात अनलॉकही सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा आणि अत्यावश्यक सेवा नसलेली दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू करण्यात आली आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आणि अंतर ठेवून अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून पूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

    follow whatsapp