महाराष्ट्रात दिवसभरात 36 हजार 176 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत 52 लाख 18 हजार 768 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.76 टक्के एवढं झालं आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 24 हजार 136 नवे रूग्ण आढळले आहेत. राज्यात दिवसभरात 601 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.61 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 35 लाख 41 हजार 565 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56 लाख 26 हजार 155 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 26 लाख 16 हजार 428 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 20 हजार 829 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 3 लाख 14 हजार 368 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
कोरोनाची तिसरी लाट…लहान मुलांना कोरोना आणि केंद्राचा मोठा खुलासा
राज्यात 24 हजार 136 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 56 लाख 26 हजार 155 इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या 601 मृत्यूंपैकी 389 मृत्यू हे मागील 48 तासांमध्ये झाले आहेत. तर 212 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूंमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या 536 ने वाढली आहे.
कोरोना काळात खासगी हॉस्पिटल मनमानी करीत असेल तर काय करावे?
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई 28855
ठाणे 23702
पुणे 45648
सातारा 18909
सांगली 14961
कोल्हापूर 15517
सोलापूर 15570
नाशिक 12793
अहमदनगर 13885
नागपूर 14556
ADVERTISEMENT