ओमिक्रॉनच्या शिरकावापाठोपाठ राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडक दिली. मात्र, दोन-तीन आठवड्यानंतर कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. दिवसेंदिवस दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं दिसून येत आहे. आज राज्यात ३३ हजार रुग्ण आढळून आले असून, दिवसभरात ८६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात राज्यात ३०,५०० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात ७१,२०,४३६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९४.०७ टक्के असून, आज ३३,९१४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात दिवसभरात ८६ कोरोना रुग्णांचा मृत्य झाला असून, सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के इतका आहे. आजपर्यंत राज्यात ७,३६,८४,३५९ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ७५,६९,४२५ म्हणजेच १०.२७ टक्के नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
सध्या राज्यात १६,२०,३७१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये असून, ३,३५८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
१ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आलेली शहरं/जिल्हे
पुणे महापालिका – ५,३२३
पिंपरी चिंचवड महापालिका – ३,२९९
नागपूर महापालिका – ३,०२३
पुणे ग्रामीण – २,०४७
नाशिक महापालिका – १,९२२
मुंबई महापालिका – १,८१५
अहमदनगर – १,०९७
दिवसभरात आढळले १३ ओमिक्रॉन बाधित रुग्ण
राज्यात आज १३ ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात पुणे महापालिका हद्दीत १२ रुग्ण, तर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत एका रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढून २,८५८ वर पोहोचली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?
मुंबई महापालिका – 1010
ठाणे जिल्हा – 00
ठाणे महापालिका – 51
नवी मुंबई महापालिका – 13
कल्याण डोंबिवली महापालिका – 11
उल्हासनगर महापालिका – 03
भिंवडी निजामपूर महापालिका – 05
मीरा भाईंदर महापालिका – 52
पालघर जिल्हा – 00
वसई विरार महापालिका – 07
रायगड जिल्हा – 02
पनवेल महापालिका – 18
नाशिक जिल्हा – 05
नाशिक महापालिका – 00
मालेगाव महापालिका – 00
अहमदनगर जिल्हा – 04
अहमदनगर महापालिका – 00
धुळे जिल्हा – 00
धुळे महापालिका – 00
जळगाव जिल्हा – 02
जळगाव महापालिका – 00
नंदूरबार जिल्हा – 02
पुणे जिल्हा – 62
पुणे महापालिका – 1,042
पिंपरी चिंचवड महापालिका – 122
सोलापूर जिल्हा – 10
सोलापूर महापालिका – 00
सातारा जिल्हा – 15
कोल्हापूर जिल्हा – 19
कोल्हापूर महापालिका – 00
सांगली जिल्हा – 59
सांगली मिरज कुपवाड महापालिका – 00
सिंधुदुर्ग जिल्हा – 00
रत्नागिरी जिल्हा – 00
औरंगाबाद जिल्हा – 20
औरंगाबाद महापालिका – 00
जालना जिल्हा – 03
हिंगोली जिल्हा – 00
परभणी जिल्हा – 03
परभणी महापालिका – 00
लातूर जिल्हा – 03
लातूर महापालिका – 00
उस्मानाबाद जिल्हा – 11
बीड जिल्हा – 01
नांदेड जिल्हा – 03
नांदेड महापालिका – 00
अकोला जिल्हा – 11
अकोला महापालिका – 00
अमरावती जिल्हा – 32
अमरावती महापालिका – 00
यवतमाळ जिल्हा – 01
बुलढाणा जिल्हा – 06
वाशिम जिल्हा – 00
नागपूर जिल्हा – 225
नागपूर महापालिका – 00
वर्धा जिल्हा – 15
भंडारा जिल्हा – 03
गोंदिया जिल्हा – 03
चंद्रपूर जिल्हा – 00
चंद्रपूर महापालिका – 00
गडचिरोली जिल्हा – 02
बाहेरील राज्यांतील – 01
राज्यातील एकूण रुग्ण – 2,858
ADVERTISEMENT