एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याच्या निर्णयाची चर्चा होत असतानाच ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारात एका एसटी कर्मचाऱ्यांने बसलाच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत. महिनाभरातच एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची तिसरी घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दिलीप हरिभाऊ काकडे या एसटी कर्मचाऱ्यांने आत्महत्या केली.
बीड : आर्थिक विवंचनेतून एसटी बस चालकाची आत्महत्या
एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप काकडे यांनी शेवगाव आगारात उभ्या असलेल्या बसच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर खळबळ उडाली.
लालपरी धावली! महागाई आणि घरभाडे भत्ता वाढणार; एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आगारातील इतर कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर पोलीसही घटना काकडे यांनी गळफास घेतलेल्या ठिकाणी पोहोचले. दिलीप काकडे यांच्या आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत असून, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
ADVERTISEMENT