ADVERTISEMENT
अभिनेता सोनु सूद आता घरात घरात पोहोचला आहे.
एरवी पडद्यावर झळकणारा सोनु सूद कोरोना काळात गरजूंच्या मदतीला धावून आला आणि लोकांसाठी खऱ्या अर्थानं हिरो ठरला.
कोरोना काळात गोरगरीब आणि गरजवंताचा मसीहा ठरलेल्या सोनु सूदने ‘मुंबई तक’शी संवाद साधला.
यावेळी त्याने गणपती बाप्पाबद्दलच्या आठवणी सांगितल्या. तसंच राजकारणात प्रवेश करण्याबद्दल भाष्य केलं.
सोनु सूदला त्याला आवडणाऱ्या राजकीय नेत्याबद्दल विचारण्यात आलं. या प्रश्नावर सोनु सूद म्हणाला, महाराष्ट्रात म्हणाल, तर उद्धव ठाकरे.
‘अनेक आवडते नेते आहेत. पण महाराष्ट्रात सांगायचं झालं, तर उद्धवजी. त्यांची स्माईल खूपच स्पेशल आहे.’
‘खूपच प्रामाणिक आहेत. त्यानंतर सांगायचं तर नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीसजी.’
‘देवेंद्र फडणवीसांना मी ते नागपूरात होते तेव्हापासूनच ओळखतो. ते खूप चांगले व्यक्ती आहे’, असं सोनु सूद म्हणाला.
‘महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं, तर मला असं वाटतं की, हे जे तीन नेते आहेत. खूप भारी आहेत’, सोनु सूदनं सांगितलं.
यावेळी सोनु सूदने होईल त्या स्वरुपात मदत करण्याचं आवाहन केलं. ‘आपण असं ठरवतो की, आपल्याकडे मदत करण्याची कुवत आली की, मदत करू असं आपण म्हणतो. मी इतकंच म्हणेन की तुम्हाला जी काही मदत करायची ती आजपासूनच सुरू करा. ती कोणत्याही प्रकारची असो’, असं आवाहन अभिनेता सोनु सूदने केलं.
कोरोना काळात ‘निष्काम जनसेवाय समर्पित’ वृत्तीने सोनु सूदने जनसेवेचा वसा घेतला.
त्याचा हा मदतयज्ञ अजूनही सुरुच आहे. अजूनही गरजवंताच्या हाकेला सोनु सोदू धावून जातो.
ADVERTISEMENT