राज्यात आजपासून अनलॉकची घोषणा करण्यात आल्यापासून विविध शहरात निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. शासनाने अनलॉकची नियमावली जाहीर करताना निकष आणि नियम जाहीर केले आहेत. या निकषांनुसार नाशिक शहर तिसऱ्या स्तरात येत आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाशिकमध्ये लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याचं जाहीर केलं.
ADVERTISEMENT
कोरोना रुग्णांचा पॉजिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन निकषांवर राज्य सरकारने जिल्ह्यांची पाच स्तरात विभागणी केली आहे. या विभागणीअंतर्गत नाशिकमध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे हे पाहूयात…
Unlock News : Maharashtra Model चं उद्योगपतींकडून कौतुक, इतर राज्यांनीही अनुकरण करण्याची सूचना
१) अत्यावश्यक सेवेतली दुकानं दुपारी ४ पर्यंत चालू राहणार
२) अत्यावश्यक सेवेत न येणारी दुकानंही दुपारी ४ पर्यंत चालू राहणार
३) शनिवार-रविवार मात्र नेहमीप्रमाणे विकेंड लॉकडाउन सुरु राहिल.
४) मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद राहतील
५) उपहारगृह ५० टक्के क्षमतेने दुपारी चारपर्यंत खुली राहतील. दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत फक्त पार्सल सेवा सुरु असेल. विकेंड लॉकडाउन काळातही उपहारगृहांची पार्सल सेवा सुरु असेल.
६) क्रीडांगण, मैदानं, मोकळ्या जागा पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत सुरु राहतील.
७) खासगी कार्यालय दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील
८) शासकीय, खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती
९) ५० टक्के उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम, अत्यंविधीला आणि दशक्रीया विधीला २० जणांची उपस्थिती
१०) ई-कॉमर्स कामकाज नियमीत सुरु राहील
११) जिम, व्यायामशाळा, सलून, पार्लर संध्याकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के उपस्थितीत सुरु राहतील.
१२) सार्वजनिक बस वाहतूकीत उभं राहून प्रवासाला परवानगी नाही.
ADVERTISEMENT