Russian Beer वर महात्मा गांधी, मदर तेरेसांचा फोटो? खरे की खोटे? वाचा सविस्तर...

कंपनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या नावाने लाँच केलेल्या बियर्सची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यामध्ये, महात्मा गांधींचं चित्र असलेल्या बियरच्या बाटलीला लेमन ड्रॉप हॅझी आयपीए उत्पादन म्हणून वर्णन केलं आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

14 Feb 2025 (अपडेटेड: 14 Feb 2025, 12:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बिअरवर महात्मा गांधी, मदर तेरेसांचा फोटो?

point

व्हायरल होणारे फोटो खरे की AI जनरेटेड?

point

कंपनीने आपल्या अधिकृत हँडल्सवर नेमकं काय म्हटलं?

Mahatma Gandhi Photo on Beer : बिअर आणि दारूच्या बाटल्यांवर छापलेले महात्मा गांधी, मदर तेरेसा आणि नेल्सन मंडेला यांसारख्या महान व्यक्तींचे फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरंय. सध्या सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. यामुळे मोठी चर्चा सुरू झाली असून, एका रशियन मद्य उत्पादक कंपनीने हे फोटो खरोखर छापलेले आहेत.

हे वाचलं का?

जगातल्या अनेक महान लोकांचे फोटो बिअरच्या बाटल्या आणि कॅनवर खरोखरंच लावण्यात आले आहेत. कारण या बिअर बनवणाऱ्या कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.

हे ही वाचा >> Crime: तरुणाने विवाहित महिलेचा जबडाच फाडला, प्रेमसंबंध अन्...

सोशल मीडियावर अनेक सोशल मीडिया पोस्टही व्हायरल होत आहेत. मॉस्कोमधील सर्जिएव्ह पोसाड येथील रेवोर्ट ब्रुअरी या बिअरच्या बॉटल बनवतंय. बाटल्यांवरील हे ग्राफिक्स आता चांगलेच व्हायरल झाले आहेत.

 

इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी अशा महान लोकांच्या फोटोंसह बिअरच्या बाटल्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यावर लोकांकडून टीका सुद्धा होताना दिसतेय. एवढंच नाही तर रेवोर्ट ब्रुअरीने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून या बॉटल्सच्या फोटोंसह अनेक फोटो देखील पोस्ट केले आहेत.



कंपनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या नावाने लाँच केलेल्या बिअर्सची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. यामध्ये, महात्मा गांधींचं चित्र असलेल्या बिअरच्या बाटलीला लेमन ड्रॉप हॅझी आयपीए उत्पादन म्हणून वर्णन केलं आहे. त्यात अल्कोहोलचे प्रमाण ABV 7.3 आहे. मदर तेरेसांचं चित्र असलेल्या बिअरला डबल चॉकलेट स्टॉ असं नाव देण्यात आलंय. त्यात अल्कोहोलचे प्रमाण ABV 6 असल्याचं सांगितले आहे.

हे ही वाचा >> बावनकुळेंची भेट घेऊन परतताना झाला अपघात, अजित पवारांच्या नेत्याचा जागीच मृत्यू

दरम्यान, 2019 च्या सुरुवातीला, एका इस्रायली कंपनीला दारूच्या बाटल्यांवर गांधीजींचा फोटो लावल्याबद्दल फटकारण्यात आलं होतं. राज्यसभेच्या सदस्यांनी दारूच्या बाटल्यांवर महात्मा गांधींचा फोटो वापरल्याबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

    follow whatsapp